33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपाला भूसंपादनासाठी हवेत १० हजार कोटी

नाशिक मनपाला भूसंपादनासाठी हवेत १० हजार कोटी

कोणत्याही शहराच्या प्रगतीसाठी रिंग रोड हे महत्त्वाचा दुवा ठरतो, नाशिक मध्ये रिंग रोडचे काम अधिक गतीने करण्यासाठी मागच्या आठवड्यात नाशिक दौर्‍यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सूचना केल्यानंतर नाशिक महापालिकेच्या 60 किलोमीटर रिंग रोडच्या कामाला गती मिळण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे,आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी बहुचर्चित व प्रस्तावित साठ किलोमीटर सिंहस्थ परिक्रमामार्गाबत सांशकता वर्तवली जात होती, तर या प्रकल्पाचा गाशा गुंडाळला जाण्याची शक्यता असतांना नाशिक दौर्‍यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या धरतीवर नाशिकमध्येही रिंगरोड तयार करण्याबाबत प्रशासनाला सुचना करुन त्यामुळे शहर विकास झपाट्याने होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले होते.

कोणत्याही शहराच्या प्रगतीसाठी रिंग रोड हे महत्त्वाचा दुवा ठरतो, नाशिक मध्ये रिंग रोडचे काम अधिक गतीने करण्यासाठी मागच्या आठवड्यात नाशिक दौर्‍यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सूचना केल्यानंतर नाशिक महापालिकेच्या 60 किलोमीटर रिंग रोडच्या कामाला गती मिळण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे,मात्र भूसंपादनासाठी तब्बल सुमारे दहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून रिंग रोडच्या कामात हीच मोठी अडचण निर्माण होऊ शकते असा अंदाज व्यक्त होत आहेआगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी बहुचर्चित व प्रस्तावित साठ किलोमीटर सिंहस्थ परिक्रमामार्गाबत सांशकता वर्तवली जात होती, तर या प्रकल्पाचा गाशा गुंडाळला जाण्याची शक्यता असतांना नाशिक दौर्‍यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या धरतीवर नाशिकमध्येही रिंगरोड तयार करण्याबाबत प्रशासनाला सुचना करुन त्यामुळे शहर विकास झपाट्याने होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले होते.त्यामुळे नाशिक मनपात यासाठी हालचाली सुरू झाल्या असल्या तरी भूसंपादनासाठी 10 हजार कोटी रुपये कोण देणार , असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रकल्पासाठी दहा हजार कोटी खर्च अपेक्षित असल्याने तो करण्यास एमएसआरडीए फारसी इच्छूक नसल्याचे दिसून आले होते. कारण हा खर्च वसूल कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे होता.
असा आहे रिंगरोड

महापालिका खत प्रकल्पापासून पाथर्डी शिवारातून वालदेवी नदीला समांतर पिंपळगाव खांब शिवार, तसेच पुढे वालदेवी नदी पलीकडे विहीतगाव शिवार, विहीतगावपासून पुढे नाशिक-पुणे महामार्ग ओलांडून चेहेडी शिवारातून पंचक गाव पुढे माडसांगवी शिवारातून महापालिका हद्दीबाहेर औरंगाबाद रोडलगत आडगाव शिवार व ट्रक टर्मिनसपर्यंत साठ मीटरचा पहिला रिंग रोड आहे. तर आडगाव ट्रक टर्मिनस येथून 36 मीटर रुंदीचा दुसरा रिंग रोड आहे. आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, नाशिक तालुक्यातील जलालपूर, बारदान फाटा, गंगापूर रोड, ओलांडून गंगापूर उजवा तट कालवा, सातपूर एमआयडीसी, पश्चिम भागालगत त्र्यंबक रोडपर्यंत व पुढे गरवारे पॉइंटपर्यंत दुसरा रिंग रोड अपेक्षीत आहे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी