33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक भुजबळांच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला मोठे भगदाड येवला मतदार संघातील शेकडो कार्यकर्ते...

नाशिक भुजबळांच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला मोठे भगदाड येवला मतदार संघातील शेकडो कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गटात सामिल

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघातील बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठे भगदाड पडले असून या गटाच्या तसेच समता परिषदेच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. संपर्कप्रमुख जयंत दिंडे आणि जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्वांना शिवबंधन बांधण्यात आले.आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश सोहळा झाल्याने जनता महायुतीला कंटाळली असून महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेना ठाकरे गटाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असल्याचे यावरून सिद्ध होत आहे.लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जास्तीत जास्त जागा मिळतील, असा विश्वास जयंत दिंडे आणि कुणाल दराडे यांनी व्यक्त केला.

शालिमार कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास तालुकाप्रमुख शिवाभाऊ सुराशे, माजी पं. स.सदस्य राजाभाऊ दरेकर, शहर प्रमुख नानासाहेब जेऊघाले,महिला आघाडी जिल्हा संघटक भारतीताई जाधव, शिवसेना पदाधिकारी सद्दाम शेख,
बापू सोडक,दिलीप चव्हाण,
नीलेश दरेकर,इमरान मोमीन,
संतोष पानगव्हाणे हे सुद्धा उपस्थित होते.
शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या निफाड तालुका उपाध्यक्ष मनीषा वाघ, निफाड पूर्व सरचिटणीस सुनीता शिंदे,सुनित बोडके,वनिता निरभवणे, पारूबाई लाटे,आशा पवार,वैशाली पवार, शीला वाघ,
ज्योती अहिरे,मनिषा जाधव, संजना माळी,पायल जाधव,
भिमाबाई काटे,योगिता माळी, सुनिता हिंगे,साधना शेलार,
प्रतिभा निकाळे,शारदा डावरे,
शोभा खैरनार,राधा चव्हाण,
वाल्याबाई शिंदे,योगिता जेऊघाले,
निर्मला धनवटे,सुरेखा धनवटे,
शांताबाई कुसळकर,लक्ष्मीबाई उपाळे, छगुबाई उपाळे,मीरा जेऊघाले,ज्ञानेश्वर वाघ,
निंबाजी वाघ,अनंता डावरे,
गोरख शिंदे,आकाश वाघ,
सौरभ जेऊघाले,प्रतिक शिरसाठ आदींचा समावेश आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी