31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयजरांगेच्या विषयावर बोलायचं नसताना देवेंद्र फडणवीसांनी लिहिली पोस्ट अन् सांगितलं, 'आता SIT...'

जरांगेच्या विषयावर बोलायचं नसताना देवेंद्र फडणवीसांनी लिहिली पोस्ट अन् सांगितलं, ‘आता SIT…’

मनोज जरांगे यांच्या संदर्भातील विषय आता राजकीय वर्तुळाच्या केंद्रस्थानी आला आहे. विधीमंडळात आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावर आणि संपूर्ण प्रकरणावर आक्षेप नोंदवत संपूर्ण प्रकराणाची एसआयटी चौकशी लावण्याची मागणी केली. विधानसभा अध्यक्षांनी ती मागणी मान्य केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “SIT गठीत करण्याबाबत मा. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केले जाईल.”

देवेंद्र फडणवीस म्हणतात…

SIT गठीत करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशांचे पालन केले जाईल. मला या विषयावर बोलायचे नव्हते, पण बोलावे लागते आहे. मराठा आरक्षण माझ्याच कार्यकाळात दिले गेले. ते हायकोर्टात टिकविले आणि मी मुख्यमंत्री असेपर्यंत सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकविले. या संपूर्ण काळात सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आदी अनेक उपाय केले आणि त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला झाला आणि आजही होतो आहे.

हेही वाचा : महाराष्ट्र बेचिराख करण्याचं कटकारस्थान केलंय का, आशिष शेलारांचा सवाल

त्यामुळेच संपूर्ण मराठा समाज माझ्या मागे उभा राहिला आणि आहे. पण मला आई-बहिणीच्या शिव्या द्यायच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे, हा काय प्रकार? कुणाकडे बैठक झाली, कुणी दगडफेक करायला सांगितली, ते आता आरोपी सांगत आहेत! या संपूर्ण प्रकारात बीडच्या घटना कशा विसरता येतील?

तुम्ही राजकारण कुठल्या स्तराला घेऊन निघाले आहात? कुणाचे कार्यकर्ते आहेत? कोण पैसा देते आहे? हे सारे समोर येते आहे आणि येईलच. मला जरांगे यांच्यावर काहीच बोलायचे नाही. पण त्यांचा बोलविता धनी कोण? हे शोधून काढले जाईल. छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबईत वॉररूम कुणी सुरू केल्या, हेही तपासात पुढे येते आहे. एक नक्की हे संपूर्ण षडयंत्र पुढे आणले जाईल. अशी शिवीगाळ कुणालाही झाली, मग ते विरोधक का असेना, तर त्याच्यासोबत उभा राहणारा हा देवेंद्र फडणवीस पहिला असेल!

हेही वाचा : Entertainment : “मीदेखील सुशांत सिंहसारखं टोकाचं पाऊल उचलणार होतो, पण…”, विवेक ओबेराॅयने सांगितला आयुष्यातला ‘तो’ किस्सा

आशिष शेलारांनी एसआयटीची केली होती मागणी…

“आज या व्यक्तीला महत्त्व द्यायचं नाही. समाज आमच्याबरोबर आहे. हे सगळं घडवणारे मनोज जरांगे राहतात कुठे हे शोधलं पाहिजे. तो कारखाना कोणाचा आहे हे शोधलं पाहिजे. तिथे आलेली दगडं कोणाच्या कारखान्यातील आहेत हे शोधलं पाहिजे. या आंदोलनाला जेसीबी ट्रॅक्टर कोणाच्या कारखान्यातून आले. या सगळ्यामागे एका व्यक्तीच्या समर्थनाची, पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसची असेल, एका कारखान्याच्या मालकाची असेल तर एसआयटी लावा”, अशी मागणी आशिष शेलारांनी यावेळी केली.

हेही वाचा : Maratha Reservation : जरांगे-पाटलांना बेअक्कल म्हणणारे अजय बारसकर आहेत तरी कोण? 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी