28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक म्हाडीची घरे मिळाली तरी झोपड्या; आजपासून अतिक्रमणाची मोहीम

नाशिक म्हाडीची घरे मिळाली तरी झोपड्या; आजपासून अतिक्रमणाची मोहीम

नाशिक महापालिका हद्दीतील विविध झोपडपट्टी भागातील नागरिकांना महापालिकेच्या वतीने यापुर्वीच म्हाडासह इतर योजनांमध्ये घरे दिलेली असताना देखील त्यांनी पुन्हा महापालिकेच्या जागांवर अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या आहे. ही बाब महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या लक्षात आल्यामुळे उद्यापासून विशेष मोहीम हाती घेऊन त्यांना नोटीसा बजावण्याची कारवाई होणार आहे.या मोहिमेची सुरुवात शहरातील गंजमाळ पंचशील नगर भागातील श्रमीकनगर येथून करण्यात येणार आहे. श्रमिक नगर भागात असलेल्या सुमारे 145 कुटुंबीयांना यापूर्वीच सुमारे सहा वर्षांपूर्वीच महापालिकेच्या माध्यमातून म्हाडा किंवा इतर केंद्र व राज्य शासनाच्या योजना अंतर्गत त्यांना घरे देण्यात आली होती.

त्यावेळेस त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात घरांचे तांबे घेतले होते तर यानंतर त्यांनी पुन्हा श्रमीकनगर भागातील मोकळ्या मैदानावर अतिक्रमण करून आपल्या झोपड्या बांधल्या आहे. त्यामुळे उद्या त्या 145 कुटुंबियांना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीसा देण्याबरोबरच मार्किंगचे देखील काम करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सुमारे 70 अतिक्रमित झोपड्यांना देखील महापालिका नोटीस बजावणार आहे. यासाठी भद्रकाली पोलिसांकडून विशेष अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. ही सर्व प्रक्रिया झाल्यावर ज्यांना घर मिळाली आहे, त्यांनी त्यांच्या घरी जाऊन हे मैदान मोकळे करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी