28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयशिवसेना काय भाजपच्या दावणीला बांधलेली नाही, 12 जागांचा प्रस्ताव मान्य नाही, शिंदे...

शिवसेना काय भाजपच्या दावणीला बांधलेली नाही, 12 जागांचा प्रस्ताव मान्य नाही, शिंदे गटाच्या खासदाराची तिखट प्रतिक्रिया

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला 32, शिंदे गटाला 12 आणि अजित पवार गटाला 4 जागा वाटपचा कथित आकडा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असताना शिंदे (Eknath Shidne) गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “12 जागांचा प्रस्ताव आम्हाला अजिबात मान्य नाही.” सोशल मीडियावर 23-12-4 असा कथित फाॅर्म्युला व्हायरल होत आहे, त्यावर अनेक जणांच्या प्रतिक्रिया येत आहेत. तसेच राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आलेले आहे. (BJP Vs Shivsena)

शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले की, “हा जो फॉर्म्युला तयार केला आहे, त्याची काही अधिकृत घोषणा झालेली नाही. हे जे 32-12-4 आकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत, याला काही आधार नाही. मुळात जागावाटपाची चर्चा कोण करतंय? त्याचा निर्णय कोण घेतंय? कुठल्या पक्षातील कोणते नेते, कोणती प्रमुख माणसं यावर काम करत आहेत? किंवा यासंबंधीचा निर्णय कोण घेत आहे? याबाबतची कुठल्याही प्रकारची माहिती आमच्याकडे नाही. मी शिवसेनेचा एक नेता आहे. आमचे मुख्य नेते पक्षाची भूमिका ठरवताना माझ्यासह आमच्याबरोबर असलेल्या इतर नेत्यांशी चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. १२ जागांबाबतचा प्रस्ताव आम्हाला अजिबात मान्य नाही.”

कीर्तिकर एका माध्यम संस्थेशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, “महायुतीत शिवसेनेला लोकसभेच्या 12 जागा देण्याबाबत काही ठरलं असेल तर ते आम्हाला मान्य नाही. 2019 च्या लोकसभेचा विचार करता आमचा 22 जागांवर दावा आहे. गेल्या निवडणुकीत भाजपा 26 जागांवर लढली होती. त्यांचे तीन उमेदवार पराभूत झाले आणि त्यांनी 23 जागा जिंकल्या. तर आम्हाला 22 जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी आमचे 4 उमेदवार पडले आणि आम्ही 18 जागा जिंकल्या. तसेच राज्यात विरोधी पक्षांचे 7 उमेदवार जिंकले.”

शिवसेना काय भाजपच्या दावणीला बांधलेली नाही

“भाजपाने जागा द्यायच्या आणि आम्ही त्या घ्यायच्या अशी आमची अवस्था नाही. त्यांनी 12 जागा दिल्यात की नाही तेदेखील आम्हाला माहिती नाही. भाजपाने 12 जागा दिल्या म्हणजे आमच्यावर उपकार केले का? भाजपाने या गोष्टी चर्चा करून ठरवाव्या. आमच्या बाजूने कोण चर्चा करतंय, कोण निर्णय घेतंय हे काही आम्हाला माहिती नाही. आम्ही आमच्या जागांवर ठाम असायला पाहिजे. तसेच एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे 13 खासदार आले आहेत त्यांना एकनाथ शिंदे यांनी योग्य संरक्षण दिलं पाहिजे. आमच्याबरोबर दगाफटका व्हायला नको. शिवसेना काय भाजपाच्या दावणीला बांधलेली नाही. आम्ही तशी बांधू देणारही नाही. आमच्याबरोर दगाफटका होऊ नये.”

… आणि उरलेल्या जागा राष्ट्रवादीला देता येतील

“एकनाथ शिंदेंबरोबर आलेल्या 13 खासदारांचं राजकीय भवितव्य टिकवणं, त्यांना राजकीय स्थिरता देणं हे एकनाथ शिंदे यांचं कर्तव्य आहे. एकनाथ शिंदे कोणाला दगा देणार नाहीत. परंतु, आम्हाला 12 जागा मान्य नाहीत. भाजपा आम्हाला इतक्या जागा देणार आणि आम्ही त्या घेणार असंही काही नाही. आम्ही केवळ 12 जागा घेऊ अशी काही स्थिती नाही. मागच्या वेळी आमचे 18 खासदार आले होते. त्यामुळे आम्हाला किमान 18 जागा मिळायलाच हव्यात. हवं तर उरलेल्या जागा राष्ट्रवादीला देता येतील”, असंही भाष्य कीर्तिकरांनी केलं आहे.

हे ही वाचा : नाशिक म्हाडीची घरे मिळाली तरी झोपड्या; आजपासून अतिक्रमणाची मोहीम

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी