28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापन दिन

नाशिक मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापन दिन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष,हिंदू जननायक सन्माननीय राज साहेब ठाकरे तसेच पक्षाचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री अमीत साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पक्षाचा वर्धापन दिन येत्या 9 मार्च रोजी नाशिक मध्ये संपन्न होणार असल्याचे समजताच आणि तसे संकेत सन्माननीय साहेबांकडून मिळाल्यानंतर नाशिक राजगड कार्यालयात तसेच सर्व नाशिक शहर आणि जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकाऱ्यांमध्ये व राज साहेबांवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांमध्ये जल्लोष निर्माण झाला. पक्षाचा वर्धापन दिन नाशिकमध्ये होणार असल्याचे वृत्त कळताच संपूर्ण जिल्ह्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष,हिंदू जननायक सन्माननीय राज साहेब ठाकरे तसेच पक्षाचे नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री अमीत साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पक्षाचा वर्धापन दिन येत्या 9 मार्च रोजी नाशिक मध्ये संपन्न होणार असल्याचे समजताच आणि तसे संकेत सन्माननीय साहेबांकडून मिळाल्यानंतर नाशिक राजगड कार्यालयात तसेच सर्व नाशिक शहर आणि जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकाऱ्यांमध्ये व राज साहेबांवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांमध्ये जल्लोष निर्माण झाला. पक्षाचा वर्धापन दिन नाशिकमध्ये होणार असल्याचे वृत्त कळताच संपूर्ण जिल्ह्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले. या कार्यक्रमासाठी जवळपास एक महिन्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि वरिष्ठगण जयत्त तयारीला लागलेले होते, शहरामध्ये सगळीकडे सजावटीचे काम, शेकडो कमानीं वरती महाराष्ट्रातून येणाऱ्या महाराष्ट्र सैनिक व सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावण्यात आले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे पदाधिकारी,महाराष्ट्र सैनिक यांना कार्यक्रम स्थळी पोहोचण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही याची काळजी आम्ही घेणारच आहोत.

संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात असलेली गोष्ट म्हणजे मराठी हृदयसम्राट सन्माननीय राज साहेबांचे नाशिक वरती असलेले विशेष प्रेम आणि मनसेच्या सत्ता काळात सन्माननीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेले विविध विकास काम, मग ते नाशिकच्या बोटॅनिकल गार्डनचे असो, वाहत्या पाण्यावरील १०० फुटी कारंजा , होळकर पुलावरील वाटर कर्टन शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने रिंग रोड असोत तसेच भविष्यातील शहराच्या पाणी प्रश्ना विषय असो किंवा त्याकाळी आयुक्त रहित नाशिक महानगरपालिकेला कुठल्याही प्रकारचा निधीचा भार न पडू देता आणि मुख्यता कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न होता वरील सर्व काम हि मा. साहेबांच्या विनंतीला मान देऊन जग विख्यात उद्योगपती सन्मानीय रतनजी टाटा साहेब यांच्या सीएसआर फंडातून झालेले नाशिक शहरातील विविध उपक्रम, अशी लोकाभिमुख अनेक विकास उपक्रम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेले सर्व नाशिककरांनी बघितलेलेच आहे.

सध्यस्थितीत महाराष्ट्रातील राजकारणात सुरु असलेलला चिखल आणि राज्याच्या राजकारणातील अर्थपूर्ण सत्ता संघर्ष बघितला तर येणाऱ्या लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या विधानसभा आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्यामध्ये सन्माननीय राज साहेब हा एकच पर्याय महाराष्ट्राला उरलेला आहे,
सन्मानीय राज साहेबांच्या मार्गदर्शना खाली मागील झालेल्या २०१५ -१६ च्या कुंभमेळाच्या यशस्वी नियोजनासाठी बलाढ्य व अति विकसनशील अमेरिके सारख्या देशाने नाशिक नगरीच्या मा. महापौर यांचा सत्कार केला म्हणूनच नाशिककरांसाठी पुढे येणाऱ्या नियोजित कुंभमेळा पर्वणीच्या पार्श्वभूमीवर आणि मनसेच्या सत्ता काळात झालेल्या विकास कामांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सन्माननीय राज साहेबांचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विचार करण्याची वेळ आता आली आहे.
हिंदू जननायक सन्माननीय राज साहेब ठाकरे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी दिनांक ७ मार्च ते ९ मार्च २०२४ पर्येंत आपल्या नाशिक नागरीमध्ये असणार आहे.दि ८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता श्री काळाराम मंदिर येथे हिंदु जननायक राज साहेब यांचे हस्ते आरती संपन्न होणार आहे. तसेच ९ मार्च रोजी अखंड महाराष्ट्रातून पक्षाचे सर्वच नेते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित राहणार आहेत. आपल्या माध्यमातून तमाम नाशिक कर जनतेला आव्हान करतो की, सन्माननीय राज साहेबांचे विचार ऐकण्यासाठी दि ९ मार्च २०२४ रोजी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात उपस्थित राहावे.आपणा सर्व पत्रकार बांधवांना महारष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १८ व्या वर्धापन दिनाचे विशेष निमंत्रण देत आहोत.

कृपया नोंद घ्यावी..वर्धापन दिन सोहळा ठिकाण :-कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह,भाबानगर, मुंबई नका,नाशिक
याप्रसंगी
प्रदेश सरचिटणीस तथा मा महापौर अशोक भाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, सलीम मामा शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, मा. शहराध्यक्ष दिलीप दातीर, सहकार सेना जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब निमसे,
विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, योगेश लबडे, धीरज भोसले, नितीन माळी, योगेश दाभाडे ,गणेश कोठुळे, सुरेश घुगे ,अनंत सांगळे,अमित गांगुर्डे,अक्षय खांडरे, मनवीसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर,शहराध्यक्ष ललित वाघ, मेघराज नवले, मिलिंद कांबळे, नितीन आहेरराव, शाम गव्हाड, संदेश जगताप व पदाधिकारी उपस्थित होते .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी