28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक शहरातील १४५ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट

नाशिक शहरातील १४५ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट

शहरातील पाणीपट्टी थकबाकीचा आकडा नव्वद कोटींवर पोहचला असून महापालिकेने अॅक्शन मोडवर येत कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील आठवडाभरात १४५ पाणीपट्टी थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडले आहे. थकबाकी अदा करा शिवाय चोरुन कनेक्शन घेतले असेल तर माहिती द्या, अन्यथा कारवाईला समोरे जा, असा थेट इशारा देण्यात आला आहे.महापालिकेची पाणी गळतीचे प्रमाण चाळीस टक्क्यांवर पोहचले असून शहरात मोठ्या प्रमाणात अवैध नळ कनेक्शन धारक पाणी चोरी करत आहे. शिवाय पाणीपट्टी थकबाकीचा आकडा नव्वद कोटींवर पोहचला आहे. थकबाकी व अवैध नळ कनेक्शमुळे मनपाला हक्काचा उत्पन्नावर पाणी सोडावे लागत अाहे.

शहरातील पाणीपट्टी थकबाकीचा आकडा नव्वद कोटींवर पोहचला असून महापालिकेने अॅक्शन मोडवर येत कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील आठवडाभरात १४५ पाणीपट्टी थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडले आहे. थकबाकी अदा करा शिवाय चोरुन कनेक्शन घेतले असेल तर माहिती द्या, अन्यथा कारवाईला समोरे जा, असा थेट इशारा देण्यात आला आहे.महापालिकेची पाणी गळतीचे प्रमाण चाळीस टक्क्यांवर पोहचले असून शहरात मोठ्या प्रमाणात अवैध नळ कनेक्शन धारक पाणी चोरी करत आहे. शिवाय पाणीपट्टी थकबाकीचा आकडा नव्वद कोटींवर पोहचला आहे. थकबाकी व अवैध नळ कनेक्शमुळे मनपाला हक्काचा उत्पन्नावर पाणी सोडावे लागत अाहे. त्यावर अखेर मार्ग काढत पाणी पुरवठा व करसंकलन विभागाने शहरातील सहाही विभागात संयुक्त मोहीम उघडली. पथक पन्नास हजारांपेक्षा जादा थकबाकी असलेल्या नागरिकांच्या घरी भेटी दिल्या जात आहेत. थकबाकीबरोबरच नळ कनेक्शन अवैध आहे का, याची तपासणी करत आहे. आठवडाभरात १४५ थकबाकीदांचे नळ कनेक्शन तोडण्याची धडक कारवाई करण्यात आली. या मोहीमेची व्याप्ती आणखी वाढवली जाणार आहे. या अगोदर मनपाने ‘अभय’ योजना राबवत अवैध नळ कनेक्शन धारक व थकबाकीदारांना कारवाईपासून सवलत दिली होती. पण त्याकडे नागरिकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे ही धडक कारवाई मोहीम उघडण्यात आली आहे.

विभागनिहाय कारवाई

विभाग कनेक्शन तोडले
पंचवटी ३८
नाशिक पूर्व ०
नाशिक रोड ४६
सातपूर ४२
नवीन नाशिक ३१
नाशिक पश्चिम ०

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी