28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रधर्म जातीच्या लढाईत हक्काची लढाई मागे आमदार बच्चू कडू

धर्म जातीच्या लढाईत हक्काची लढाई मागे आमदार बच्चू कडू

मी सगळ्या समाजाला विनंती करतो कि माझ्यासहित नेत्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका कारण आता निवडणूका आहेत त्यामुळे सगळीकडे धर्म आणि जातीची लढाई दिसत आहे आता एका ताट्यात जेवणारे लोक ताट हिसकाउ लागले आहेत मात्र यात हक्काची लढाई मागे राहिल्याचे आमदार बच्चू कडू म्हणाले. ते नाशिकमध्ये रविवारी पत्रकारांशी बोलत होते.बच्चू कडू यांनी कापसाचे कांद्याचे भाव पडले त्यामुळे कापूस विकावा की नाही असे शेतकरी फोन करतात . त्यात बांगलादेश ने बंदी लावली म्हणून संत्रा पडून आहे याचा मी निषेध करतो.

मी सगळ्या समाजाला विनंती करतो कि माझ्यासहित नेत्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका
कारण आता निवडणूका आहेत त्यामुळे सगळीकडे धर्म आणि जातीची लढाई दिसत आहे आता एका ताट्यात जेवणारे लोक ताट हिसकाउ लागले आहेत मात्र यात हक्काची लढाई मागे राहिल्याचे आमदार बच्चू कडू म्हणाले. ते नाशिकमध्ये रविवारी पत्रकारांशी बोलत होते.बच्चू कडू यांनी कापसाचे कांद्याचे भाव पडले त्यामुळे कापूस विकावा की नाही असे शेतकरी फोन करतात . त्यात बांगलादेश ने बंदी लावली म्हणून संत्रा पडून आहे याचा मी निषेध करतो.

छगन भुजबळ यांच्या राजीनामाबद्दल बोलताना मी या सगळ्या बाबतीत मी 20 तारखेला पत्रकार परिषद घेऊन बोलेल दोन समाजात वाद होईल असं कधी बच्चू कडू बोलणार नाही. शिवजयंती नंतर आम्हीही पत्रकार परिषद घेतोय अठरापगड जातींना घेऊन शिवाजी महाराजांनी राज्य केलं नवीन निर्णय घ्यायची आमची ताकद नाही समाज आम्हाला ताकद देईल तेव्हा आम्ही निर्णय घेऊ . मराठा आरक्षणाबाबत जरांगे पाटील यांनी गुलाल उधळला याबाबत देखील २० तारखेला पत्रकार परिषदेत बोलतो.

भाजप आमदारांच्या गोळीबाराबद्दल बोलताना बंदूक देशासाठी काढा स्वतःसाठी नाही .तेच शेतकऱ्यांसाठी कष्टकरांसाठी गोळी मारली असती तर आम्ही त्यांच स्वागत केले असते असे कडू म्हणाले. किरीट सोमय्या मीडियासमोर मांडत नाही तर ते कागदपत्र देखील घेऊन फिरतात. प्रहार बद्दल बोलताना शेतकऱ्यांच्या सोयीचं आम्ही राजकारण करू. भाजपला जशी लोकसभा महत्त्वाची आहे तशी आम्हाला विधानसभा आहे. विधानसभेच्या वाटाघाटी झाल्या तरच लोकसभेला आम्ही भाजप सोबत राहू . नाहीतर आम्ही जळगाव अमरावती या ठिकाणी निवडणुका लढू. आम्ही लोकसभेचा दावा करत नाही विधानसभेचा दावा करतोय आता निश्चित झालं तरच आम्ही लोकसभेला काम करू . प्रहार हाच आमचा कोटा आम्हाला दुसऱ्याच्या कोट्यात जायची गरज नाही. आम्ही जानकर, राजू शेट्टी यांच्यासोबत मिटींग लावत आहोत कारण शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन शेट्टी , जानकर लढत असतील तर त्यांच्यासोबत बैठक घेणार आहोत असे आमदार कडू म्हणाले.

त्यांच्या मनात काय मी कसे सांगणार ?
प्रकाश आंबेडकर यांच्या मनात त्यांच्या मनात काय आहे हे मी सांगू शकणार नाही . त्यांच्यासारख्या मोठ्या माणसाच्या मनात काय सुरू आहे हे मला माहीत नाही. ते बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहे . माझ्यासारख्यांनी त्यांच्यावर बोलणं योग्य नाही असे आमदार बच्चू कडू म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी