28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक आमदार देवयानी सुहास फरांदे यांच्या माध्यमातून महाकवी कालिदास कलामंदिर येथे 'नारी...

नाशिक आमदार देवयानी सुहास फरांदे यांच्या माध्यमातून महाकवी कालिदास कलामंदिर येथे ‘नारी शक्ति वंदन मार्गदर्शन मेळावा

आमदार देवयानी सुहास फरांदे यांच्या माध्यमातून महाकवी कालिदास कलामंदिर येथे 'नारी शक्ति वंदन मार्गदर्शन मेळावा व पी एम स्वनिधी परिचय बोर्ड वाटप' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महिला व बाल कल्याण विभाग अंतर्गत महिला बचत गटांना विविध योजनांविषयी माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातील ८५० महिला बचत गट यांनी या मेळाव्यात सहाभाग निंदविलेला केंद्र शासनाच्या पी एम स्वनिधी योजने अंतर्गत १२०० लाभार्थ्यांना कार्ड व धनादेशाचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने महिलांना मार्गदर्शन देखील केले.

आमदार देवयानी सुहास फरांदे यांच्या माध्यमातून महाकवी कालिदास कलामंदिर येथे ‘नारी शक्ति वंदन मार्गदर्शन मेळावा व पी एम स्वनिधी परिचय बोर्ड वाटप’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महिला व बाल कल्याण विभाग अंतर्गत महिला बचत गटांना विविध योजनांविषयी माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातील ८५० महिला बचत गट यांनी या मेळाव्यात सहाभाग निंदविलेला केंद्र शासनाच्या पी एम स्वनिधी योजने अंतर्गत १२०० लाभार्थ्यांना कार्ड व धनादेशाचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने महिलांना मार्गदर्शन देखील केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील महिला बचत गटांचे सक्षमीकरण करून त्याद्वारे महिलांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे स्पष्ट करताना महिलांनी अधिकाधिक एकत्र येऊन बचत गट स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून पी एम स्वनिधी योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना भांडवल उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. नाशिक विधानसभा मतदारसंघात सहा हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ झाला असून अधिकाधिक नागरिकांनी व फेरीवाल्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस माधुरीताई नाईक यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा उपस्थित महिलांसोबत मांडला. बचत गटाच्या माध्यमातून जागृती निर्माण करून महिला सक्षमीकरण करण्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी केलेल्या प्रयत्नाचे अभिनंदन करताना महिला सक्षम झाल्या तरच राष्ट्र सक्षम होऊ शकते अशा भावना व्यक्त केल्या. पी एम स्वनिधी योजनेअंतर्गत नाशिक मध्ये विधानसभा मतदारसंघात ६००० लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला यासाठी अभिनंदन करताना केंद्र शासनाच्या योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत जाणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
या मेळाव्यात सुमारे ३५०० बचत गटाच्या प्रतिनिधी वपी एम स्वनिधी योजनेच्या लाभार्थीं महिला उपस्थित होत्या व सभागृह गच्च भरले होते.

यावेळी नाशिक मध्य विधानसभेच्याआमदार प्रा. सौ. देवयानी सुहास फरांदे यांच्या सह भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस. सौ. माधुरी ताई नाईक, प्रमुख अतिथी सौ. रंजना शिंदे, सौ. गायत्री जाधव, सौ. पल्लवी वक्ते, सौ. अनुराधा लोंढे भाजपा शहरअध्यक्ष प्रशांत जाधव,, नगरसेविका स्वाती भामरे, दीपाली कुलकर्णी, अर्चना थोरात, रुपाली निकुळे, संध्या कुलकर्णी, रोहिणी नायडू, अनिता भामरे, रुपाली निकुळे, रुपाली नेर, संगीत जाधव , अलका जांभेकर, रोहिणी रकटे अदींसह भाजपा महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सोनल कासलीवाल-दगडे,यांनी तर सूत्रसंचालन सिमा पेठकर यांनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी