27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरेंनीच स्वतः आमच्यातील मैत्रीचे दरवाजे बंद केले; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

उद्धव ठाकरेंनीच स्वतः आमच्यातील मैत्रीचे दरवाजे बंद केले; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीसंदर्भात स्वतः फडणवीसांना उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, “राजकीय मतभेद झाले तर ते मिटवता येतात. त्यावर काहीतरी पर्याय काढता येतो. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तसं नाही. आता आमची मनं दुखावली आहेत. सध्या दिवसरात्र उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते आमच्या मोदींना शिव्या देत असतील तर आम्ही कसे काय त्यांच्यासह जाणार?”, असा प्रश्न फडणवीसांनीच उपस्थित केला आहे.

एका माध्यमसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या मैत्रीबद्दल उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, “रोज 10-20 शिव्या मोदींना दिल्या नाहीत तर त्यांना अन्न पचत नाही. काही लोक त्यांनी असे सोडले आहेत जे 9 वाजता भोंगा सुरु करतात, मोदींना शिव्या देणं सुरु करतात आणि संध्याकाळपर्यंत तेच करतात. त्यामुळे आता त्यांच्यासोबत काहीही झालं तर जाणार नाही”, अशी स्पष्ट भूमिका मांडत संजय राउतांवर निशाणा साधला.

मैत्रीचे दरवाजे त्यांनी बंद केले : फडणवीस

उद्धव ठाकरे माझे मित्र होते. ते आत्ता मित्र आहेत की नाहीत हे त्यांना विचारलं पाहिजे. मित्र तो असतो जो फोन उचलून सांगतो की तू मागणी करतो आहेस पण हे शक्य नाही. ज्यावेळी युती म्हणून निवडून आलो. त्यावेळी त्यांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं. पाच वर्षे जेव्हा आम्ही सत्तेत होतो तेव्हा मी कधीही त्यांना टाळलं नाही. त्यांचा फोन मी कायम घ्यायचो. मात्र 2019 मध्ये मी निकालानंतर जेव्हा त्यांना फोन केले तेव्हा त्यांनी घेतलेच नाहीत. शिवाय मला त्यांनी फोन केलाच नाही.

मला त्यांनी सांगितलंच नाही की आता आपण बरोबर नाही. मैत्रीचे दरवाजे त्यांनी बंद केले.त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तु्म्ही उद्धव ठाकरेंना विचारा. सगळे मार्ग त्यांनी बंद केले. त्यानंतर औपचारिक बोलणं कधीही झालेलं नाही. समोरासमोर भेट झाली तर कसे आहात विचारतो. तेवढी कर्टसी अजूनही महाराष्ट्रात आहे.आम्ही 25 वर्षे ज्यांच्याशी सुखं दुःखं वाटली, आम्ही भावंडांप्रमाणे राहिलो. असे लोक जेव्हा आमच्या पाठित विश्वासघाताचा खंजीर खुपसतात आणि वाईट वागणूक देतात तेव्हा मन दुखावतं, असं देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांसमोर सांगितलं आहे.

मला हवा तसा अजेंडा चालवू शकतो : फडणवीस

“मी सध्या उपमुख्यमंत्री असलो तरी मला हवा तो अजेंडा चालवू शकतो. प्रत्येक सरकारची एक काम करण्याची पद्धत असते. पूर्वीच्या सरकारमध्ये मी मुख्यमंत्री होतो. त्यावेळी माझे अधिकार आणि काम करण्याची क्षमता वेगळी असते. आता मी उपमुख्यमंत्री असलो तरी पूर्वी जो अजेंडा चालवत होतो, तोच चालवू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधीही मी हातात घेतलेल्या कामाला सहकार्य करतात. माझे अधिकार उपमुख्यमंत्र्यांचे आहेत पण मी मला हवे ते काम करु शकतो”, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

हेही वाचा : Lok Sabha Elecation : आम्ही लोकसभा निवडणुकीत किमान ‘इतक्या’ जागा जिंकू, फडणवीसांनी सांगितला आकडा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी