28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रउद्धव बाळासाहेब ठाकरे हातकणंगले, सांगलीतले गणित चुकतय

उद्धव बाळासाहेब ठाकरे हातकणंगले, सांगलीतले गणित चुकतय

उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या जागा वाटपचा तिढा अजून सुटलेला दिसत नाही. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील प्रबळ दावेदार असताना तो मतदारसंघ सोडला जातो.दुसरीकडे सांगली लोकसभा मतदारसंघात काही नसताना त्या मतदारसंघावर दावा केला जातो. त्यामुळे उद्धव साहेब या दोन्ही मतदारसंघातल्या गणित चुकते असं , सध्या चित्र निर्माण झाला आहे.

 

उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या जागा वाटपचा तिढा अजून सुटलेला दिसत नाही. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील प्रबळ दावेदार असताना तो मतदारसंघ सोडला जातो.दुसरीकडे सांगली लोकसभा मतदारसंघात काही नसताना त्या मतदारसंघावर दावा केला जातो. त्यामुळे उद्धव साहेब या दोन्ही मतदारसंघातल्या गणित चुकते असं , सध्या चित्र निर्माण झाला आहे.

BCCI ने दिली सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांना खूशखबर, केंद्रीय करारात केले सामील 

चहा, कॉफी नाही… तर सकाळी रिकाम्या पोटी करा ‘या’ 3 गोष्टींचे सेवन, रोगांपासून रहा दूर
सांगली लोकसभा मतदारसंघात आमदार विश्वजीत कदम यांनी उमेदवारी नाही मिळाल्यास बंड करणार असल्याचें सांगितले.150 ग्रामपंचायती दहा जिल्हा परिषद सदस्य पंचवीस पंचायत समिती सदस्य सहा साखर कारखान्याचे चेअरमन इतके संख्याबळ असतानाही या ठिकाणी काँग्रेसला मतदारसंघ हवा होता.ठाकरे शिवसेनेकडे एकही ग्रामपंचायत नाही तरी ह्या मतदारसंघात त्यांना मिळत आहेत त्यामुळे आम्ही बंडखोर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात डॉक्टर सुजित मिणचेकर,सत्यजित पाटील,उल्हास पाटील
हे तीन माजी आमदार शिवसेना ठाकरे गटाचे आहेत.अण्णा सोबत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,मानसिंग नाईक,आमदार राजू आवळे यांची सोबत आहे.

बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण अडचणीत वाढ; सुप्रीम कोर्टाने बजावली अवमानाची नोटीस

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला आहे. शेट्टी यांनी वाहन कास आघाडी सोबत न येता त्यांनी पाठींबा द्या असं सांगितलं आहे.काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोयीसाठी इतर लोकसभा मतदारसंघात पाठिंबा मिळावा यासाठी शेट्टी यांना पाठिंबा दिला असल्याचे सांगितले जाते.

उद्धव ठाकरे यांच्या समोर पेच
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे बळ असले तरी या गटाच्या तीन माजी आमदार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी विरोध दर्शवला आहे.इतरही शेतकरी संघटनेचे नेते ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. माजी आमदार निवडणुकीत तयार नसतील तर शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन मतदारसंघ पुन्हा बळकट करावा अशी मागणी येथील शिवसेनिकांची होत आहे.

तर कोल्हापुरात ही होणार बंड
सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळालेला आहे.हा काँग्रेसला बालेकिल्ला असून मतदारसंघ काँग्रेसला पुन्हा मिळावा अन्यथा आम्ही बंड करणार असल्याचे आमदार विश्वजीत कदम यांनी सांगितलं आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाटेला आला होता मात्र तो काँग्रेसने घेतला.सांगली तसे झाल्यास कोल्हापूरला सुद्धा आम्ही बंद करूअसे शिवसैनिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर मत व्यक्त केले.

उद्याच्या बैठकीकडे लक्ष
उद्या शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी याबाबतचा विचार करावा असेही हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनिकांनी सांगितले आहे. उद्याच्या बैठकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा विचार लक्षात घेतल्यास पॉझिटिव्ह चर्चा होईल, असेही एका शिवसैनिकांने नाव सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी