31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपाला चरसाठी शासनाच्या मंजुरीची प्रतिक्षा

नाशिक मनपाला चरसाठी शासनाच्या मंजुरीची प्रतिक्षा

नाशिक महापालिकेचे जलसंपदाने 6100 दलघफू पाणी आरक्षण फेटाळत 5300 दलघफू पाणी मंजूर केले. त्यामुळे आठशे दलघफू पाण्याची तूट निर्माण झाली आहे. 31 जुलैपर्यंत नाशिककरांची तहान भागवायची असेल. यावर तोडगा म्हणून जलसंपदाने मृतसाठ्यातील सहाशे दलघफू पाणी उचलण्याची परवानगी दिली. मात्र धरणाची पातळी 598 मीटरच्या खाली गेल्यास धरणाच्या मध्य भागातून जॅकवेलपर्यंत पाणी आणण्यासाठी चर (इंटेक वेल) खोदावी लागणार आहे. आचारसंहिता असल्याने महापालिका प्रशासनाने चर (char) खोदण्याचे पत्र शासनाच्या (awaits govt’s nod for char) प्रधान सचिवाकडे पाठवले आहे. दरम्यान मनपाला शासनाच्या मंजुरीची प्रतिक्षा असून 3 एप्रिल रोजी पत्र पाठवलेले आहे.शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरसह दारणा धरण क्षेत्र समुहातून जायकवाडीत तब्बल साडे तीन टीएमसी पाणी सोडल्याने यंदा नाशिकवर पाणी कपातीचे संकट ओढावले आहे.(Nashik Municipal Corporation awaits govt’s nod for char)

विशेष म्हणजे महापालिकेला 31 जुलै पर्यत शहराला पाणी पुरवण्याचे आव्हान असणार आहे. याकरिताच थेट गंगापूर धरणात चर खोदण्याच्या हालचाली सुरु आहे. मात्र आचारसंहिता लागल्याने पालिकेची पंचायत झाली. परंतु यातून मार्ग काढत चर खोदण्यासाठी थेट प्रधान सचिवांना पत्र पाठवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने निविदा खोलता आली नाही. निविदा उघडली असती तर हा आचारसंहितेचा भंग झाला असता. यानंतर मनपा प्रशासनाने पर्याय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे चरबाबत परवागनी घेतली. मात्र निविदा उघडली जाणार असली तरी तत्पूर्वी मनपाने प्रधान सचिवांना चर खोदण्याबाबत पत्र पाठविले आहे.त्यामुळे चर खोदण्यासाठी आचारसंहितेचा कोणताही परिणाम होणार नाही. नाशिककरांवरील पाणीसंकट वाढत असून शहरातील गावठाण भागात टॅकर्सची मागणी वाढू लागली आहे. अद्याप चार महिने पाणी पुरवण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. चर खोदण्यास परवानगी मिळाल्यास पाणीबाणी दूर होईल.े त्यामुळे ही परिस्थिती टाळण्यासाठी पाणी पुरवठा विभागाने चर खोदण्यापुर्वी सर्वेक्षणासाठी निविदा प्रक्रिया राबवली. वेळीच चर खोदण्याचा पर्याय हाती घेतला नाही तर मृतसाठ्यातील पाणी देखील उचलता येणार नाही व शहरात पाणी कपातीचा कटू निर्णय घ्यावा लागू शकतो.

चरमुळे भविष्याचा प्रश्न मीटणार
गेल्या वर्षी सरासरी पेक्षा पर्जन्यमान कमी झाल्याने याचा फटका नाशिक जिल्हयासह महाराष्ट्राला बसला आहे. मागील वर्षी शहराला पाणी पुरवठा करणारी धरने नव्वद टक्केपेक्षा भरली होती. परंतु मराठवाडयाची तहान भागविनाऱ्या जायकवाडी धरण समूहात पाणीसाठा कमी असल्याने नाशिकमधून पाणी सोडावे लागले. दरम्यान गंगापूर धरणातील मृतसाठ्यातील पाणी उचलण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून चर चा पर्याय हाती घेतला आहे. चर खोदल्यास भविष्यात याचा फायदाच होणार आहे. म्हणूनच चर खोदण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून हालचाली सुरु आहे. दरम्यान शासनाने मनपाने पाठविलेल्या पत्राला तात्काळ मंजुरी देणे आवश्यक आहे. अन्यथा शहरात पाणीबाणी परिस्थिती उदभवण्याची शक्यता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी