28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक महापालिका मुख्यालय दरवळले पुष्पोत्सवाने

नाशिक महापालिका मुख्यालय दरवळले पुष्पोत्सवाने

महापालिका मुख्यालय विविधरंगी फुलांनी सजले असून या फुलांचा सुगंध मुख्यालयात दरवळला. नाशिक महापालिका उद्यान विभागाच्यावतीने आयोजीत पुष्पोत्सवाचे उदघाटन अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आमदार देवयानी फरांदे,आमदार सीमा हिरे, आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी व उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांच्यासह मनपाचे अधिकारी आदी उपस्थित होते.पुष्पोत्सव प्रदर्शनाच्या निमित्ताने विविध गटात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून त्यासाठी १७९७ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. पुष्पोत्सवात वेगवेगळ्या नर्सरीचे स्टॉल व वीस फूड स्टॉल वर नागरिकांची गर्दी होती. सेल्फी पॉइंट वर अनेक नाशिककर आपली छबी टिपण्यात व्यस्त होते.

महापालिका मुख्यालय विविधरंगी फुलांनी सजले असून या फुलांचा सुगंध मुख्यालयात दरवळला. नाशिक महापालिका उद्यान विभागाच्यावतीने आयोजीत पुष्पोत्सवाचे उदघाटन अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आमदार देवयानी फरांदे,आमदार सीमा हिरे, आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी व उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांच्यासह मनपाचे अधिकारी आदी उपस्थित होते.पुष्पोत्सव प्रदर्शनाच्या निमित्ताने विविध गटात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून त्यासाठी १७९७ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. पुष्पोत्सवात वेगवेगळ्या नर्सरीचे स्टॉल व वीस फूड स्टॉल वर नागरिकांची गर्दी होती. सेल्फी पॉइंट वर अनेक नाशिककर आपली छबी टिपण्यात व्यस्त होते. महापालिका मुख्यालयाच्या तिन्ही मजल्यावर विविध प्रकारची गुलाबपुष्पे, मौसमी फुले, फळे, भाजीपाला, हार, बुके पुष्परचना, बोन्साय, कॅक्टस, शोभिवंत कुंड्या यांची सजावट याची सर्वाना उत्सुकता होती. पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी ९ फेब्रुवारीला गणेशवाडी फूल बाजार येथून सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती.

सांस्कृती कार्यक्रमांची मेजवानी
पुष्पोत्सव प्रदर्शन ११ फेब्रुवारीपर्यंत सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत सुरु राहणार आहे . १० फेब्रुवारीला सकाळ सत्रात निसर्ग व फुलांवर आधारित कविता सत्र व सायंकाळी संगीतसंध्या होईल. ११ फेब्रुवारीला संगीत रजनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच दिवशी विजेत्यांना ट्रॉफीचे वितरण अभिनेता किरण गायकवाड व अभिनेत्री शिवानी बावकर यांच्या हस्ते होणार आहे.

भाजीपाला, पुष्प रांगोळी आकर्षण
गुलाब पुष्पे या प्रकारात ४४६ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. त्याचबरोबर कृत्रिम आच्छादनाखालील गुलाबपुष्पे गटात २३०, तर गुलाबपुष्पे खुला गटात ८३ प्रवेशिका आहेत. मोसमी बहुवर्षीय फुलांच्या गटात ५२१, तर कुंडीतील शोभा व वनस्पती घाटात २६२ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत.
११४ पुष्परचना व ४३ प्रवेशिका फळे व भाजीपाला गटात, तर ९८ प्रवेशिका कुंड्यांची सजावट मध्ये आहेत एकूण १७९७ प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. पुष्पोत्सवात पहिल्या मजल्यावर गुलाब पुष्परचना व शुष्क काष्ठ तर दुसर्‍या मजल्यावर मोसमी बहुवर्षीय, बोन्साय, कॅक्टस फुले ठेवली जाणार आहे. तिसर्‍या मजल्यावर फळे व भाजीपाला तबक उद्यान आणि पुष्प रांगोळी नाशिककरांसाठी आकर्षण ठरणार आहे.

सेल्फि पॉईट अन संगीत मैफील
प्रवेशव्दारावर फुलांची आकर्षक कमान उभारण्यात येणार असून प्रांगणात सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहे. प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण मिनीएचर लॅन्डस्केपिंग करण्यात येणार आहे. १० फेब्रुवारी रोजी सकाळ सत्रात निसर्ग व फुलांवर आधारीत कविता सत्र आणि सायंकाळी संगीत मैफील रंगणार आहे. पुष्प स्पर्धेव्यतिरिक्त नागरिकांकडून निसर्गावर आधारित पेंटींग, फुलांची माहिती देणारे छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी