29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकची लाईफलाईन रुळावर मात्र पुन्हा कधी संप होणार याची भिती कायम

नाशिकची लाईफलाईन रुळावर मात्र पुन्हा कधी संप होणार याची भिती कायम

९ दिवसांच्या संपानंतर शनिवारी म्हणजेच दहाव्या दिवशी नाशिकची लाईफलाईन म्हणजे सिटिलिंक < citilink > बसेस रस्त्यावर धावल्या, मात्र आता पुन्हा त्यांचा कधी संप होतो अशी भिती प्रवाशांच्या मनात निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन कायमचा तोडगा काढावा, अशी मागणी नाशिककरांकडून करण्यात येत आहे.
वाहकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी यंदा तब्बल नऊ दिवस संप पुकारला होता. सिटिलिंक वाहक चालकांचा संप मिटल्याने शनिवारी (दि.२३) सकाळपासून नाशिकची जीवनवाहिनी पूर्वपदावर धावू लागल्याने प्रवाशांमध्ये समाधानासह भिती देखील व्यक्त करण्यात येत होती. तपोवन डेपोतील १९६ बसेस डेपोतून बाहेर पडल्या तर दुसरीकडे नाशिकरोड डेपोतील ५४ बसेसची सेवा मात्र प्रारंभापासून सुरूच होती.(Nashik’s Lifelan on track However, fears of another strike remain.)

नाशिककरांना चांगच्या दर्जाची प्रवासी सेवा देऊनही केवळ वाहक पुरवठादार ‘मॅक्स डिटेक्टिव्ह अ‍ॅन्ड सेक्युरीटीज’ या दिल्लीस्थित ठेकेदार कंपनीच्या आठमुठेपणामुळे सिटीलिंकला संपाला सामोरे जावे लागले होते. ठेकेदाराकडून नियमित वेतन न मिळणे, अपुरे वेतन, ग्रॅच्युएटी व भविष्य निर्वाह निधी रक्कम अदा न करणे, दिवाळी बोनस, कर्मचार्‍यांवर अन्यायकारक दंडात्मक कारवाई अशा विविध कारणांमुळे वाहकांनी आतापर्यंत नऊ वेळा संप पुकारला. ७ मार्च पर्यंत डिसेंबरचे उर्वरीत वेतन देण्याचे आश्वासन ठेकेदाराने पाळले नाही,त्यामुळे वाहकांनी संप सुरू केला होता. दरम्यान संप काळात प्रवाशांचे हाल मोठे हाल झाल्याचे पहायला मिळाले. रिक्षा व खासगी वाहनधारकांनी संपाचा फायदा घेत अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी करून प्रवाशांची एक प्रकारे लुट केली. प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करण्याशिवाय अन्य पर्याय शिल्लक राहिला नव्हता. त्यामुळे चांगली सेवा देऊनही सिटीलिंकला नालस्ती सहन करावी लागली. त्यामुळे संप काळात पुन्हा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
१८०० फेर्‍या रद्द

नऊ दिवसांच्या संप काळात सिटी लिंकच्या १८०० फेर्‍या रद्द झाल्याने मनपाला सुमारे एक कोटी रुपयांचा फटका बसला आहे. पंचवटीतील तपोवन डेपो येथील बसेसना वाहक पुरविण्याचा ठेका मे. मॅक्स डिटेक्टिव्ह अँड सिक्युरिटी या कंपनीला देण्यात आलेला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी या कंपनीच्या वाहकांनी १४ मार्चपासून संप पुकारला होता. त्याचा मोठा फटक मनपाच्या महसुलाला बसला
हा मनसेनेचा दणका

संपावर त्वरीत तोडगा काढण्यासाठी मनपा आयुक्तांना भेटलो होतो, यानंतर कारवाई होऊन संप मिटविण्यात आला. हा मनसेनेचा दणकाच आहे. त्याच प्रमाणे आता प्रशासनाने लवकरात लवकर सिटी लिंक बस सेवेसाठी नवीन ठेकेदाराची नेमणूक करावी, जेणेकरून प्रवाशांचे व नाशिककरांचे हाल होणार नाही. त्याचप्रमाणे पुन्हा असे अचानक संप झाले व शहरातील अत्यावश्यक सेवा बंद पडली तर मनसेना स्टाईलने राजीव गांधी भवन येथे महापालिका प्रशासना विरोधात आंदोलन करण्यात येईल.
– सलीम शेख, प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
पर्यायी व्यवस्था करावी
सिटीलिंक कर्मचार्‍यांनी नऊ दिवसानंतर संप मागे घेतला असला तरी या काळात मोठ्या प्रमाणवर गैरसोय झाली. कामासाठी दररोज नाशिक शहरात यावे लागत असल्याने बस वेळेवर नसल्याने पास असून देखील महामंडळाच्या बसला वेगळे पैसे देऊन प्रवास करावा लागला. तसेच शहरात इतर ठिकाणी जायचे असल्यास रिक्षाने प्रवास करावा लागला. त्यामुळे रिक्षा चालकांकडून जादा भाडे आकारण्यात आले. सिटीलिंककडून पुन्हा प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
– प्रसाद जाधव, प्रवासी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी