29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमहादेवरावांनी पवारांच्या मनातलं जाणलंच नाही; अजित पवार घेणार फायदा?

महादेवरावांनी पवारांच्या मनातलं जाणलंच नाही; अजित पवार घेणार फायदा?

रासपचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) आणि महायुतीमधील प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर महादेव जानकर यांनी महायुतीसोबत राहणार असल्याचे जाहीर केले. जाणकरांच्या या निर्णयाने शरद पवारांना(sharad pawar) मोठा धक्का बसला आहे. महादेवरावांनी पवारांच्या मनातलं जाणलचं नाही, अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडं या गोष्टीचा फायदा अजित पवार घेणार असल्याचे बोलले जात आहे.  जानकर आता बारामतीतून (baramati lok sabha) लढणार का? अशी विचारणादेखील होत आहे. त्यामुळं बारामतीत पवार विरुद्ध पवार या प्रतिष्ठीत लढतीत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या काही दिवासांपूर्वी, शरद पवार(sharad pawar यांनी माढा लोकसभा मतदारसंघासाठी मनातलं नाव जाहिर केलं होतं. ते म्हणजे महादेव जानकर यांचं. पण जानकर यांनी पवारांच्या मनतलं न ओळखता महायुतीला पाठिंबा देण्याचं ठरवलं. त्यामुळे पवार आता कोणता पत्ता टाकणार? याकडं सर्वांच लक्ष वेधलं आहेच. पण या सर्वांत बारामतीत मतदारसंघाचीदेखील जोरदार चर्चा रंगली आहे. कारण…

माढ्याच्या जागेसाठी शरद पवारांच्या मनातील उमेदवार कोण?

बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार ही प्रतिष्ठेची लढाई मानली जात आहे. मात्र, ऐनवेळी जर अजित पवार यांनी राजकीय खेळी करत महादेव जानकर यांना बारामतीत उतरवले तर पवारांना विरोध करणाऱ्या अनेकांना गप्प करण्यास अजित पवारांना यश येणार असल्याचे बोललं जात आहे.

कुटुंबातील लढाईवर शरद पवारांच्या बहिणीचं मोठं वक्तव्य; कोणाची घेतली बाजू?

जानकर यांना बारामतीतून उमेदवारी दिल्यास धनगर समाजाच्या मतांवर प्रभाव पडू शकतो. याशिवाय सध्या विजय शिवतारेंनी अजित पवारांना दर्शवलेला विरोध, हर्षवर्धन पाटील, अनंतराव थोपटेंची नाराजी..या सगळ्या नाराजांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांऐवजी जानकरांना बारामतीचं तिकीट मिळू शकतं असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात तगडा उमेदवार मिळू शकतो असंही बोललं जात आहे.

सुळेंना दिली होती टक्कर

दौंड इंदापूर आणि बारामती विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर धनगर समाज आहे. २०१४ ला सुप्रिया सुळेंना टक्कर देताना याच समाजाने जानकरांना भरभरून मतं दिली. महादेव जानकर यांच्या पाठीशी भाजपने मोठी ताकद उभी केली होती. २०१४ ला सुप्रिया सुळेंना एकूण ५ लाख २१ हजार ५६२ मते मिळालेली. तर, महादेव जानकर यांना ४ लाख ५१ हजार ८४३ मते मिळाली होती. त्यावेळी केवळ ६९ हजार ६६६ मताधिक्याने सुप्रिया सुळे विजयी झाल्या होत्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी