आचारसंहिते मध्ये गौळाणे गावात एका विशिष्ट ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू केले असून सदर काम निकृष्ट दर्जाचे आहे. < Goulne Road work in poor quality >सदर काम त्वरीत न थांबवल्यास आंदोलनाचा बडगा उचलण्यात येईल अशा प्रकारचा इशारा गौळणे गावचे सरपंच अजिंक्य चुंभ ळे
या कामाची चौकशी व्हावी तसेच आचारसंहिते अशा प्रकारचे निवेदन हे सरपंच चुंभळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नामदेव खेडेकर यांना केले आहे. तर या संदर्भात श्री खेडकर यांच्याशी बोलणे केले असता त्यांनी सांगितले की सदर कामाला आचारसंहितेपूर्वी मान्यता मिळाली असून निकृष्ट दर्जाचे काम असल्यास त्या संदर्भात चौकशी केली जाईल.
यासंदर्भात गौळणे गावचे सरपंच अजिंक्य चुंभळे
यांनी सांगितले की, गौळणे गाव इथं अभय चोकशी या ठेकेदाराने डांबरीकरण च काम चालू केलं कुठली कल्पना ग्रामपंचायतीला न देता लोकसभेचे आचारसंहिता लागू झाल्यानंतर काम चालू केलं आहे. काम अतिशय खालच्या दर्जाचा आहे. सरपंच या नात्याने सांगू इच्छितो की, काम त्वरित बंद करण्यात यावे. त्याची सखोल चौकशी व्हावी. उपोषणास बसावा लागेल ठेकेदाराचं बोलणं फार उद्धट आहे. अधिकारी आणि आम्ही बघून घेऊ अस ठेकेदार सांगत आहे. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दिसून येत आहे. कामाचं कुठले इस्टिमेट सदर ग्रामपंचायतीला दिले नाही. इस्टिमेटप्रमाणे काम पण नाही. आमच्या ग्रामपंचायतला कुठलाही विश्वासात न घेता काम चालू केलं आहे. त्वरित ते काम बंद करा व त्या कामाची सखोल चौकशी चालू करावी. ठेकेदारावर कारवाई करावी. सदर ठेकेदारावर आयकर विभागाने यापूर्वी दहा टाकलेले आहे असे असतानाही त्या अधिकाऱ्याला पाठीशी घालणाऱ्या व त्यांना ठेका देणाऱ्या ज्ञानेश्वर खेडकर यांच्यावरही कारवाई करावी. अशी मागणी श्री. चुंभळे यांनी केली आहे.
सदर ठेकेदारावर आयकर विभागाने यापूर्वी दहा टाकलेले आहे असे असतानाही त्या अधिकाऱ्याला पाठीशी घालणाऱ्या व त्यांना ठेका देणाऱ्या ज्ञानेश्वर खेडकर यांच्यावरही कारवाई करावी. अशी मागणी श्री. चुंभळे यांनी केली आहे.