आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलिसांच्या वतीने शनिवारी (दि.९) हद्दीत रूट मार्च करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली पेठरोडवरील फुलेनगर पोलीस चौकी येथून रूट मार्चला सुरूवात करत पेठफाटा, दिंडोरी नाका, पंचवटी कारंजा, इंद्रकुंड, मालेगाव स्टँडमार्गे रामकुंड असा काढण्यात आला होता. यावेळी पोलिस निरीक्षक(प्र.)नंदन बगाडे व इतर अधिकाऱ्यांसह केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे २५ व पंचवटी पोलीस स्टेशन कडील २१ पोलीस अधिकारी, अंमलदार, कर्मचारी व होमगार्ड यांचा एकत्रित रूट मार्च पार पडला.
नाशिक पंचवटी पोलिसांकडून हद्दीत रूट मार्च