29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिकरोडला उद्यान विभागासाठी त्या अधिकाऱ्याची फिल्डींग

नाशिकरोडला उद्यान विभागासाठी त्या अधिकाऱ्याची फिल्डींग

पालिका प्रशासनाने नाशिकरोड विभागीय कार्यालयातील उद्यान विभागातून चार महिन्यापूर्वी बदली केलेल्या संबंधिताकडून उद्यान विभाग पुन्हा मिळविण्यासाठी जोरदार फिल्डींग लावल्याची चर्चा आहे. याकरिता माजी नगरसेवकांना हाताशी धरुन त्यांच्या मध्यस्तीने नाशिकरोडच्या उद्यान विभागाचा ताबा घेण्याचे मनसुबे असल्याची जोरदार चर्चा नाशिकरोड परिसरात होत आहे. दरम्यान पालिका प्रशासनाने असा निर्णय घेतल्यास, मनसे आपल्या स्टाइलने आंदोलन करेल. असा इशारा पालिका प्रशासनाला दिला आहे.नाशिकरोड येथील उद्यान विभागातील तत्कालीन निरीक्षकाच्या कारभारावरुन नागरिकांनी थेट पालिका मुख्यालयात तक्रारी केल्या होत्या. तसेच मनसेने याप्रकरणी पालिका प्रशासनाला निवेदन दिले होते.

पालिका प्रशासनाने नाशिकरोड विभागीय कार्यालयातील उद्यान विभागातून चार महिन्यापूर्वी बदली केलेल्या संबंधिताकडून उद्यान विभाग पुन्हा मिळविण्यासाठी जोरदार फिल्डींग लावल्याची चर्चा आहे. याकरिता माजी नगरसेवकांना हाताशी धरुन त्यांच्या मध्यस्तीने नाशिकरोडच्या उद्यान विभागाचा ताबा घेण्याचे मनसुबे असल्याची जोरदार चर्चा नाशिकरोड परिसरात होत आहे. दरम्यान पालिका प्रशासनाने असा निर्णय घेतल्यास, मनसे आपल्या स्टाइलने आंदोलन करेल. असा इशारा पालिका प्रशासनाला दिला आहे.नाशिकरोड येथील उद्यान विभागातील तत्कालीन निरीक्षकाच्या कारभारावरुन नागरिकांनी थेट पालिका मुख्यालयात तक्रारी केल्या होत्या. तसेच मनसेने याप्रकरणी पालिका प्रशासनाला निवेदन दिले होते. तर पूर्वचे आमदार ॲड राहुल ढिकले यांनी संबंधिताची उद्यान विभागातून बदलीची मागणी केली होती. परंतु प्रशासन पुन्हा संबंधिताला त्याच विभागात बसवण्याच्या तयारीत आहे. सध्या नाशिकरोड उद्यान विभागाची जबाबदारी पूर्व विभागाचे कनिष्ठ अभियंता संजय ओहळ यांच्यावर आहे. गेल्या वर्षी नाशिकरोड विभागातील उद्यानचा कारभार चव्हाटयावर आला होता. नागरिकांनी तक्रारी करुनही त्याकडे डोळेझाक केली जायची. विना परवानगी झाडे तोडणाऱ्यांवर कुठलीही कारवाइ केली जात नसे. उद्यानांची देखभालीचे तीन तेरा वाजले होते. यावरुन थेट पालिका मुख्य कार्यालयात तक्रारी करण्यात आली होती. प्रशासनाला जाग आल्यावर त्यांनी उद्यानमधून त्या निरीक्षकाला बाजूला करत दुसऱ्या ठिकाणी नेमले. वादग्रस्त अनेक वर्षापासून एकाच विभागात असल्याने सबंधिताच्या बदलीची मागणी वारंवार केली जात होती. संबंधिताच्या कार्यकाळात नाशिकरोड मधील उद्यानांची दुरावस्था होती. पालिका एकीकडे कोट्यावधींची उधळ्पट्टी उद्यानांवर करते. मात्र ठेकेदारांवर वचक न ठेवता बिले काढली जायची. त्यामुळे उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीचा अभाव दिसून येत होता, याप्रकरनी नागरिकांनी संबंधिताविरोधात तक्रार केल्याचे दिसून आले होते. मात्र पुन्हा उद्यान विभागात येण्यासाठी संबंधित अधिकारी धडपड करत असल्याची चर्चा रंगली आहे.

महापालिका प्रशासनाने वादग्रस्त ठरलेल्या संबंधितास पुन्हा नाशिकरोडच्या उद्यान विभागात बसवून नये. अन्यथा याविरोधात मनसे स्टाइलने आंदोलन केले जाइल.
-ॲड. नितीन पंडीत, मनसे शहर संघटक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी