29 C
Mumbai
Sunday, July 7, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजातपंचायतचा लढा आता जागतिक पातळीवर....

जातपंचायतचा लढा आता जागतिक पातळीवर….

२०१३ मध्ये नाशिक येथे झालेल्या एका ऑनर किलींग नंतर जातपंचायत विरोधी लढा सुरु झाला. तो राज्यभर गेला. आता या लढ्याची दखल ऑस्ट्रेलियन सरकारकडून घेतली जाणार आहे. जातपंचायतच्या लढ्यावर त्यांच्याकडून लघुपट बनविणार असल्याची माहिती मिळाल्याचे जातपंचायत मुठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले आहे.दहा वर्षांपूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी जातपंचायतीच्या उपक्रमास नाशिक हून आरंभ केला होता. परिणामी, त्यामुळे महाराष्ट्रातील जातपंचायतींचे भीषण वास्तव उघड झाले. अंधश्रध्देवर आधारित न्यायनिवाडे, अघोरी शिक्षेच्या घटना, जातीतून बहिष्कृत करण्याचा प्रकार, आर्थिक दंड, जात शुध्दीकरणाच्या नावाखाली चालणारे शोषण आदी विषय प्रसार माध्यमांनी लावून धरले.

२०१३ मध्ये नाशिक येथे झालेल्या एका ऑनर किलींग नंतर जातपंचायत (Caste panchayat ) विरोधी लढा सुरु झाला. तो राज्यभर गेला. आता या लढ्याची दखल ऑस्ट्रेलियन सरकारकडून घेतली जाणार आहे. जातपंचायतच्या (Caste panchayat ) लढ्यावर त्यांच्याकडून लघुपट बनविणार असल्याची माहिती मिळाल्याचे जातपंचायत (Caste panchayat ) मुठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले आहे.दहा वर्षांपूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी जातपंचायतीच्या उपक्रमास नाशिक हून आरंभ केला होता. परिणामी, त्यामुळे महाराष्ट्रातील जातपंचायतींचे भीषण वास्तव उघड झाले. अंधश्रध्देवर आधारित न्यायनिवाडे, अघोरी शिक्षेच्या घटना, जातीतून बहिष्कृत करण्याचा प्रकार, आर्थिक दंड, जात शुध्दीकरणाच्या नावाखाली चालणारे शोषण आदी विषय प्रसार माध्यमांनी लावून धरले.(The fight for caste panchayats is now on a global scale.)

राज्यभरात मोठ्या प्रमाणावर जातपंचायती बरखास्त करण्यात अंनिसला यश आले होते. महाराष्ट्र सरकारने जातपंचायतींच्या मनमानी विरोधात सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा केला. असे कायदा बनविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

अंनिसच्या या लढ्याची दखल अनेक देशांनी घेतली आहे.अमेरिकेचे प्रमुख दैनिक लॉस एंजलिस टाइम्सने या लढ्यावर प्रकाशझोत टाकला. त्यांच्या संपादकीय मध्ये त्यावर आग्रलेख लिहिण्यात आला. बीबीसीनेही याच मुद्द्याची दखल नुकतीच घेतली आहे.फ्रान्सच्या आकाशवाणीवर त्याविषयी वार्तांकन झाले आहे. पाच देशात बनलेला ‘ इन द नेम ऑफ ऑनर’ या चित्रपटात या लढ्याची माहिती देण्यात आली आहे. यावर अनेक मराठी,हिंदी वेबसिरीज व चित्रपट तयार झाले आहे. दोन व्यक्तींनी या विषयावर पीएचडी केलेली आहे.फ्रान्सच्या आकाशवाणीवर त्याविषयी वार्तांकन झाले आहे. पाच देशात बनलेला ‘ इन द नेम ऑफ ऑनर’ या चित्रपटात या लढ्याची माहिती देण्यात आली आहे. यावर अनेक मराठी,हिंदी वेबसिरीज व चित्रपट तयार झाले आहे. दोन व्यक्तींनी या विषयावर पीएचडी केलेली आहे.

आता ऑस्ट्रेलियन सरकारची वृत्तवाहिनी स्पेशल ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस ( एस.बी.एस.) हे जातपंचायतच्या कुप्रथेविरोधात लघुपटाची निर्मीती करणार आहे. त्यांच्या प्रतिनिधीने नुकतीच याबाबत कृष्णा चांदगुडे यांच्याशी चर्चा केली. लवकरच ऑस्ट्रेलियन कलाकर व तंत्रज्ञ नाशिक व महाराष्ट्राच्या विविध भागात येऊन या लढ्याचे शुटींग करणार आहेत.ते जातपंचायतच्या पिडीतांची भेट घेणार आहे. त्यांची आबबिती जागतिक पातळीवर पोहचवणार आहे. यानिमित्ताने नाशिकचे व जातपंचायत विरोधी लढ्याचे नाव जगासमोर येणार आहे.यानिमित्ताने नाशिकचे व जातपंचायत विरोधी लढ्याचे नाव जगासमोर येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी