35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रछगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून..येवला तालुक्यातील देवना साठवण तलावाच्या कामास कार्यारंभ आदेश

छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून..येवला तालुक्यातील देवना साठवण तलावाच्या कामास कार्यारंभ आदेश

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ < Chhagan Bhujbal > यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या येवला तालुक्यातील प्रलंबित ९ कोटी ४७ लक्ष रुपयांच्या देवना सिंचन < Deona Pond > प्रकल्पाच्या कामाला कार्यारंभ आदेश प्राप्त झाले आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित देवना सिंचन प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून वन विभागाच्या हद्दीत येणाऱ्या देवना सिंचन प्रकल्पास ९ कोटी ४७ लक्ष रकमेच्या कामास कार्यारंभ आदेश प्राप्त झाला असून फॉरेस्ट क्लिअरन्स नंतर या कामाला सुरुवात होणार आहे.कंत्राटदाराला हे काम मिळण्यानंतर कंत्राटदाराने पाठपुरावा करून फॉरेस्ट क्लिअरन्स करण्याचे बंधन या कामाच्या अटीशर्तींमध्ये आहे.(Through the efforts of Chhagan Bhujbal.. Work on Devana storage pond in Yeola taluka begins)

त्यामुळे कंत्राटदाराच्या पाठपुराव्यामुळे फॉरेस्ट क्लिअरन्स च्या कामाला मदत होणार आहे. सतत दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या येवला तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असून विविध योजनांच्या माध्यमातून येवला तालुक्यातील सिंचन क्षमता वाढविण्यात येत आहे. त्यापैकी येवला तालुक्यातील महत्वपूर्ण योजना असलेल्या देवना साठवण तलाव योजनेसाठी मंत्री छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून वन विभागाच्या हद्दीत येणाऱ्या देवना सिंचन प्रकल्पास १२ कोटी ७७ लक्ष रकमेच्या या कामाला दि २१ जाने २०२१ रोजी जलसंधारण महामंडळाकडून मंजुरी मिळवली होती. त्यानंतर दि.५ फेब्रु २०२१ ला जलसंधारण विभागाच्या मुख्य अभियंता यांनी ८ कोटी ९५ लाख किमतीला तांत्रिक मान्यता दिली. कोविड आल्यामुळे कोविडमधील आर्थिक निर्बंधांमुळे सर्व कामे स्थगित झाली होती.कोविड संपल्यानंतर या कामावरील स्थगिती उठवण्यात येऊन निविदा प्रक्रिया राबवण्यात आली.तीन निविदाधारकांनी निविदा भरल्या होत्या. मात्र सदर योजना ही फॉरेस्ट एरियात असल्यामुळे निविदा मंजुरीनंतर तिन्ही निविदा धारकांनी काम करण्यासाठी नकार कळवला. त्यानंतर या कामाची फेरनिविदा प्रसिद्ध करण्यात आली होती.

देवना साठवण तलाव ही येवला तालुक्यात खरवंडी व देवदरी गावाच्या जवळ दोन मोठ्या नाल्यांच्या संगमावर माणिकपुंज मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असून येवला तालुक्यातील देवदरी,खरवंडी,राहडी,कोळम खु.,या गावाच्या शिवारातील शेतीस उपसा पद्धतीने सिंचनाचा लाभ होणार आहे. तसेच,वन्य प्राण्यांच्या पिण्यासाठी व रोपवाटीकेसही लाभ होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून २.०८ दलघमी (७३.४४दलघफू) पाणी वापरासाठी पाणी उपलब्धता उपलब्ध होणार आहे. या योजनेसाठी संयुक्त मोजणीनुसार वैजापूर तालुक्यातील १३.०० हेक्टर व येवला तालुक्यातील ४४.०० हेक्टर अशी एकूण ५७.०० हेक्टर क्षेत्र संपादित होत आहे. त्यापैकी ५५.७५ हेक्टर वनक्षेत्र असून १.२५ हेक्टर क्षेत्र हे खाजगी आहे. या योजनेची एकूण किंमत ९ कोटी ४७ लक्ष असून योजनेच्या बुडीत क्षेत्रापैकी ५७ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. फॉरेस्ट क्लिअरन्स नंतर लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी