30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमनोरंजनअनुराग कश्यप म्हणतोय, 'मला भेटायचं असेल तर 15 मिनिटांसाठी एक लाख द्या'

अनुराग कश्यप म्हणतोय, ‘मला भेटायचं असेल तर 15 मिनिटांसाठी एक लाख द्या’

बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतो. आता तो एका वेगळ्याच गोष्टीमुळं चर्चेत आला आहे. लोकांना भेटण्यासाठी अनुराग कश्यप अॅडव्हान्स पेमेंट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्याने दरदेखील ठरवले आहेत. नुकतचं अनुराग कश्यपनं न्यू कमर्सबाबत तसेच त्याला भेटायला येणाऱ्या लोकांच्याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. (Anurag Kashyap says he is going to start charging people for meetings ) त्याच्या या पोस्टनं सर्वांचे लक्ष वेधले आहे.

अनुराग कश्यपनं(Anurag Kashyap) नुकतंच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लोकांना त्याला भेटायचे असेल तर आता पैसे मोजावे लागणार अशी माहिती दिली आहे. त्याचा हा निर्णय पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर काही नेटकरी त्याच्या या पोस्टवर कमेंट करत खिल्ली उडवत आहेत.

नेमकं काय म्हणालाय अनुराग कश्यप?

आतापर्यंत मी माझा बराच वेळ नवीन कलाकारांना संधी देण्यासाठी खर्च केला आहे. त्यामुळे मी आता यापुढे माझा वेळ कोणत्याही ऐऱ्यागैऱ्याला ज्यांना असं वाटतं की ते कलाकार आहेत त्यांना भेटण्यात वाया घालवणार नाही. त्यामुळे मी आता मला भेटण्यासाठी काही दर ठरवले आहेत.

जर कोणाला मला भेटायचे असेल तर मी 10-15 मिनिटांसाठी एक लाख घेणार, अर्ध्या तासासाठी 2 लाख आणि 1 तासासाठी 5 लाख रुपये घेणार. मी वेगवेगळ्या लोकांना भेटून थकलो आहे. तुम्हाला जर हे दर परवडत असतील तर मला कॉल करा आणि मी पैसे अॅडव्हान्स घेणार आहे.”

बिग बींचा लेक लवकरच करणार राजकारणात एन्ट्री; चर्चेला उधाण

“आणि मला मेसेज किंवा कॉल करू नका. पैसे द्या आणि माझा वेळ घ्या. मी चॅरटी करायला नाहीये. मी आता शॉर्टकट शोधणाऱ्या लोकांना कंटाळलो आहे.”, असंही अनुरागनं पोस्टमध्ये लिहिलं.

View this post on Instagram

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)

अनुरागची ही पोस्ट पाहता सिनेसृष्टीत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तर नेटकऱ्यांनी अनुरागच्या या पोस्टची खिल्ली उडवली आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स?

सर मी तुमच्या दारावरची बेल वाजवणारच होतो. तर एकानं म्हटलं की, ठिक आहे मला तुम्हाला भेटून झाल्यानं बाहेर पडायचे मी पैसे घेईन. ही तुझ्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनची स्क्रिप्ट आहे का? अशी विचारणा एका युजरने केली आहे, तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, “सर, लोनसाठी अप्लाय करुन तुमच्यासोबत बोलतो.”

उर्वशी रौतेला करणार राजकारणात एन्ट्री? लोकसभेचं मिळालं तिकीट

अनुरागच्या(Anurag Kashyap) वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ब्लॅक फ्रायडे, देव डी, गुलाल, दॅट गर्ल ईन यलो बुट्स आणि गॅंग्स ऑफ वासेपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. त्याच्या या चित्रपटांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. एके वर्सेस एके या चित्रपटात अनुरागनं काम देखील केलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी