28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक संघटनेची ध्येयधोरणे समजून संघटना वाढीसाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करा- करण गायकर

नाशिक संघटनेची ध्येयधोरणे समजून संघटना वाढीसाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करा- करण गायकर

काल शासकीय विश्रामगृह येवला या ठिकाणी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेश महासचिव शिवाजीराजे मोरे केंद्रीय कार्याध्यक्ष विजय अण्णा वाहुळे आयटी विभाग प्रदेश संपर्कप्रमुख वैभव दळवी महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष मनोरमाताई पाटील महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संगीता ताई सूर्यवंशी नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख नवनाथ वैराळ ग्रामीण जिल्हा संघटक गोरख संत सांस्कृतिक पर्यटन आघाडी जिल्हाप्रमुख भारत पिंगळे विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख संदीप फडोळ वारकरी आघाडी जिल्हाप्रमुख चेतन महाराज नागरे महिला जिल्हा संपर्कप्रमुख रेखाताई पाटील महिला आघाडी सविता ताई वाघ रूपालीताई काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये येवला तालुक्याचा पदग्रहण सोहळा व नवनियुक्त कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी सांगितले की संघटना ही आपला आत्मा आहे आपण ज्या पद्धतीने स्वतःला जपतो स्वतःची काळजी घेतो त्याच पद्धतीने संघटनेची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे जपले पाहिजे येवला विधानसभा निवडणूक आपण लढणार आहोत त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्याने तन-मन-धनाने संघटना वाढीसाठी काम केले पाहिजे प्रत्येक भावनिहाय पदाधिकाऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे प्रत्येक गावात संघटनेची शाखा लागले गेले पाहिजे यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा या मतदारसंघातले स्वतःला मोठे समजणाऱ्या नेते या मतदारसंघाचा विकास करू शकले नाही आज फेब्रुवारी महिना सुरू असताना सुद्धा यावल्यामध्ये 25 ते 30 पाण्याचे टँकर सुरू झाली आहे येवला पूर्व भागात आतापर्यंत कुठलाही विकास या व्यक्तीकडून करण्यात आला नाही पूर्व भाग कायम दुष्काळग्रस्त कसा राहील आणि तेथील लोक फक्त यांचा प्रचार यांच्या सभेला कसे येतील याची पुरेपूर काळजी या मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली आहे. ओबीसीचा मी विकास केला म्हणणाऱ्या छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघातील एखाद्या गरीब घरातील माळी समाजाच्या व्यक्तीला मोठे केले असे एखाद्या उदाहरण त्यांनी दाखवावं मोठ्या लोकांना कोणी मोठा करतात परंतु गोरगरीब झोपडीतील एखाद्या माणसाला त्याचा विकास केला त्याला खऱ्या अर्थाने ओबीसीच्या सवलतींचा लाभ करून दिला असे उदाहरण त्यांनी दाखवावे फक्त जातीय रंग देऊन स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या लोकांना येणाऱ्या काळात आपण संघटनेच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवून देऊ त्यासाठी तुम्ही सर्वांनी आजपासून कामाला लागायचे आहे ज्या ज्या पदाधिकाऱ्यांना आज आपण नियुक्ती दिली आहे त्यांनी लवकरात लवकर संघटनेची ध्येय धोरणे समजून संघटना वाढीस कामाला लागायचे आहे.
प्रदेश महासचिव शिवाजीराजे मोरे विजय वाहुळे जिल्हाप्रमुख नवनाथ वैराळ चेतन नागरे यांनीही उपस्थित पदाधिकाऱ्यांना संघटना वाढीसाठी व आपल्या पदांच्या जबाबदाऱ्यांच्या संदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामीण जिल्हा संघटक गोरख संत यांनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी