31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपा प्रवेशद्वारावर फेकला भाजीपाला

नाशिक मनपा प्रवेशद्वारावर फेकला भाजीपाला

महापालिका अतिक्रमण विभागाकडून शहरातील भाजी विक्रेत्यांवर अन्याय होत असून त्यांच्या रोजीरोटीवर बुलडोजर चालवले जात असल्याचा आरोप करत विक्रेत्यांनी मनपाच्या प्रवेशद्वारावर भाजीपाला टाकत निषेध नोंदवला. आम्हाला फेरीवाला झोनमध्ये स्थान देऊन अन्याय कारक कारवाई थांबवा अन्यथा विष प्राषाण करु, असा इशारा नवसंघर्ष संघटनेने निवेदनाद्वारे मनपा प्रशासनाला दिला. संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असून अशा बिकट परिस्थितीत शेतकरी व शेतमाल विकणार्‍या भाजीविक्रेत्यांवर महापालिका अतिक्रमण विभागाकडून अन्यायकारक कार्यवाही होत आहे. त्यामुळे आमचे घर उघड्यावर आले आहे.

महापालिका अतिक्रमण विभागाकडून शहरातील भाजी विक्रेत्यांवर अन्याय होत असून त्यांच्या रोजीरोटीवर बुलडोजर चालवले जात असल्याचा आरोप करत विक्रेत्यांनी मनपाच्या प्रवेशद्वारावर भाजीपाला (Vegetables) टाकत निषेध नोंदवला. आम्हाला फेरीवाला झोनमध्ये स्थान देऊन अन्याय कारक कारवाई थांबवा अन्यथा विष प्राषाण करु, असा इशारा नवसंघर्ष संघटनेने निवेदनाद्वारे मनपा प्रशासनाला दिला. संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असून अशा बिकट परिस्थितीत शेतकरी व शेतमाल विकणार्‍या भाजीविक्रेत्यांवर महापालिका अतिक्रमण विभागाकडून अन्यायकारक कार्यवाही होत आहे. त्यामुळे आमचे घर उघड्यावर आले आहे.(Vegetables thrown at Nashik Municipal Corporation entrance)

सिडको, सातपूर,पंचवटी नाशिकरोड या ठिकाणी भाजी विक्रेतेयोल हक्काचा व्यवसाय करण्यासाठी हॉकर्स झोन जागा मिळत नाही तोपर्यंत अतिक्रमण विभागाने कारवाई थांबवावी अशी मागणी भाजी विक्रेता संघटनेने केली आहे. निवेदनावर संघटना अध्यक्ष समाधान अहिरे, नितीन मुर्तडक, सुरेश टर्ले, राजू घोरपडे, सतीष बनसोडे, संपत पाटिल, सविता कराळे, मारुती वर्‍हाळे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी