30 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeराजकीयवैशाली दरेकर श्रीकांत शिंदेंना भारी पडणार..

वैशाली दरेकर श्रीकांत शिंदेंना भारी पडणार..

महाराष्ट्रात राजकारणाचे वारे वाहत असताना एखाद्या विस्तवाला हवा लागावी आणि भडका उडावा असे बरेच विषय सध्या पेटलेले दिसताहेत. कोण समाजाचं राजकारण करतंय नि कोण सत्तेच हे सर्वांच्याच लक्षात आता यायला लागलंय. नुकतंच दादा अजित पवार यांनी मुलींच्या कमी जन्मदराचा मुद्दा मांडत  महिलांविषयी बोलताना काही काळाने द्रौपदी सारखी परिस्थिती उद्भवेल असं वक्तव्य केलं.

महाराष्ट्रात राजकारणाचे वारे वाहत असताना एखाद्या विस्तवाला हवा लागावी आणि भडका उडावा असे बरेच विषय सध्या पेटलेले दिसताहेत(Vaishali Darekar greater than Shrikant Shinde). कोण समाजाचं राजकारण करतंय नि कोण सत्तेच हे सर्वांच्याच लक्षात आता यायला लागलंय.
पुरुष मुख्य असताना जेव्हा मतदार संघात महिला उमेदवारी जाहीर केली जाते तेव्हा खरंच ती लढत त्या महिलेशी असते की ती फक्त एक कळसूत्री बाहुली म्हणून उभी केलेली असते. बऱ्याचदा हे असच चित्र आपल्याला आपल्याला पाहायला मिळतं.  यावेळेस लोकसभा निवडणुकीत तब्बल 14 महिला उमेदवारांना उमेदवारी जाहीर केल्या कारणाने या निवडणुकीत महिलांची छाप नक्की पडणार यात शंका नाही. पण पुन्हा तेच , यापैकी किती महिला या स्वबळावर, वा कुठल्याही पुरुष राजकर्त्याचा चेहरा न वापरता लढा देणार हे जास्त महत्त्वाचं ठरणार आहे
महिला उमेदवारांमध्ये आवर्जून जे नाव घेता येईल, वा ज्या काटे की टक्कर देऊ शकतील त्या आहेत वैशाली दरेकर.
कल्याण मतदार संघासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे, किंवा सुषमा अंधारे तर कधी  केदार दिघे यांच्या नावाची चर्चा होत असताना  वैशाली दरेकरांचं नाव जाहीर करून उद्धव ठाकरेंनी सर्वांनाच अनपेक्षित धक्का दिलाय.
तर वैशाली दरेकरच का. तर विषय ही तसाच आहे. कल्याण मतदार संघ विशेषत ओळखला जातो तो मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे नि  गणपत गायकवाड या 2 चेहऱ्यांसाठी. अगदी ground level ला यांचा नावाचा गाजावाजा तिथे पाहायला मिळेल.
पण काही महिन्यांपूर्वी श्रीकांत शिंदेच्या कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांवर  वैयक्तिक कारणामुळे गोळीबार केल्याने गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहेत, अर्थात त्यामागे फक्त वैकतिक कारण नसून राजकीय हेतू नक्कीच असणार आहे, हे सर्वानाच माहितीये. एकीकडे ठाण्यात मुख्यमंत्री असताना , कल्याण मध्ये पुत्राचे श्रीकांत शिदेचे वर्चस्व असेल असेच वरवर दिसत असेले तरी आता परिस्थिती मात्र वेगळी आहे. कल्याण लोकसभा मतदार संघाचे ६ विधानसभा मतदार संघ असून उल्हासनगर मधून कुमार आयलानी, कल्याण पूर्व मध्ये गणपत गायकवाड , डोंबिवली मध्ये रवींद्र चव्हाण असे भाजपचे आमदार असून, कल्याण ग्रामीण मधून रवींद्र चव्हाण हे मनसेचे तर मुंब्रा-कळवा मध्ये राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आमदार आहेत. जवळपास इथे भाजपचे एकूण चित्र दिसत असताना उमेदवार मात्र शिवसेना शिंदे गटाचा जाहीर केल्याने भाजप कार्यकर्त्यांमंध्ये श्रीकांत शिंदे विषयी चांगलाच नाराजीचा सूर दिसून येतोय.नुकतीच यासंदर्भात कार्यकर्त्यांनी गणपत गायकवाडांच्या घरी बैठक घेऊन शिंदेंचा प्रचार न करण्यासंदर्भात निर्णय घेतल्याचं कळत आहे. त्याचबरोबर गणपत गायकवाडांच्या पत्नी हि सुलभा गायकवाड या वैशाली दरेकर यांच्या प्रचार सभेत आढळून आल्याने या मतदार संघातील कार्यकर्त्यांचा कल कोणाच्या बाजूने आहे हे दिसून येतंय. डोंबिवलीचे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच वाद असतील; तसेच मनसेचे राजू पाटील यांच्याशी असलेल्या वादामुळे या मतदार संघात श्रीकांत शिंदेंना अनुकूल वातावरण सध्या दिसत नाही. त्यात श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी शिवसेना  शिंदे गटा कडून जाहीर न करता ती देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याने कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच नाराजी आहे. हे चित्र दिसत असतानाही फडणवीसांनी शिंदेंना हि उमेदवारी देवून काय खेळी खेळलीये हे सर्वाना लवकरच कळेल. यावर भाष्य करताना श्रीकांत शिंदे धनुष्यबाणावर लढणार कि कमळावर , असा टोला हि वैशाली दरेकर यांनी मारला होता.
मूळच्या शिवसैनिक असलेल्या वैशाली दरेकर या २००९ च्या कल्याण लोकसभा निवडणुकीत मनसे कडून उभ्या राहिलेल्या.  २०१० मध्ये पांडुरंगवाडी या वॉर्ड मधून मनसेच्या नगरसेविका म्हणून त्यांनी काम पाहिलं. कल्याण-डोंबिवली महापालिकेत विरोधी पक्षनेत्या म्हणून त्या कार्यरत होत्या. पण पक्षातील वादामुळॆ त्या पुन्हा शिवसेनेकडे परतल्या. आणि आता शिंदेंच्या विरोधात ठाम भूमिका मांडत , उद्धव ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिल्याने कार्यकर्त्यांचा त्यांना नक्कीच पाठिंबा असणार आहे, हे नक्की. सुलभा गायकवाडांनी जर दरेकरांना पाठिंबा दिलाच तर त्यांच्या बाजुचीही निर्णायक मतं दरेकरांच्या बाजूने पडली तर हि लढत शिंदेंना नक्कीच भारी पडणार.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी