35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रप्रकाश आंबेडकर मोठा निर्णय घेण्याची शक्यता; म्हणाले, 'मी लाचारी...'

प्रकाश आंबेडकर मोठा निर्णय घेण्याची शक्यता; म्हणाले, ‘मी लाचारी…’

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत मिळून लोकसभेची निवडणूक लढणार की, स्वतंत्र त्या बद्दल संभ्रम कायम आहे. प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) हे वांरवार आपली नाराजी बोलून दाखवतायत. दरम्यान, त्यांना महाविकास आघाडीकडून(Mahavikas Aghadi) घाईत कोणताही निर्णय घेऊ नका, अशी विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत महत्वाचे वक्तव्य केले आहे. चळवळीला लाचार केलं जात आहे आणि लाचार करून संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा गंभीर आरोप आंबेडकर यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीवर केला आहे.(Prakash Ambedkar big statement vanchit bahujan aghadi party Mahavikas Aghadi)

प्रकाश आंबेडकर उद्या सकाळी 11 वाजता राजकीय भूमिका जाहीर करणार असून, यासाठी आज वंचित बहुजन आघाडीकडून राज्य कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात आली आहे. आंबेडकर 28 मार्चला अकोल्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचा घटक म्हणून की स्वतंत्र लढणार यावर उद्याच्या पत्रकार परिषदेत शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान, या बैठकीपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी या ट्विटर हँडेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे त्यामध्ये त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत मविआला इशारा दिला आहे.

लोकसभेपूर्वी NDA ला आणखी एक धक्का; भाजपने घेतला मोठा निर्णय

“वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या मतदारांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन,” अशी कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिली आहे.

काय म्हणालेत प्रकाश आंबेडकर?

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी वंचित आघाडीने युतीबाबत काय केले पाहिजे, याबाबतचा सल्ला दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. माझ्या आजोबांनी चालवलेली चळवळ लाचारीच्या विरोधात होती आणि लाचारी मीही मान्य करणार नाही. निवडणुकीत अडचण येऊ नये म्हणून आम्हीही व्यक्तिगत हेवेदावे केले नाहीत.

मात्र,आता चळवळीलाच लाचार केलं जात आहे आणि लाचार करून संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आम्ही कदापीही मान्य करणार नाही,” असं म्हणत आंबेडकर यांनी अप्रत्यक्षरित्या मविआला इशारा दिला.

तसेच, मी सर्व शाहू-फुले-आंबेडकरवादी मतदाराला मी सांगतो की, काही गोष्टी उघड बोलू शकत नाही, मात्र काही ठिकाणी आपण जिंकणार आहोत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे चळवळीचा विचार हा सर्वांत महत्त्वाचा आहे. आपण सार्वजनिक जीवन जगतो आणि जो सार्वत्रिक निर्णय आहे, त्याला आपण सर्वांना मान्य केलं पाहिजे. तेव्हा वंचित बहुजन आघाडी जी भूमिका घेईल, त्या भूमिकेला शाहू-फुले-आंबेडकरी विचाराच्या प्रत्येकाचा पाठिंबा असेल, असं मी गृहित धरतो, असा विश्वास आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केला.

त्यांच्या या व्हिडीओनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. आंबेडकर नेमकी काय भूमिका घेणार की, ठाकरेंसोबतची युती तोडणार? याकडं सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी