30 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रलोकसभेपूर्वी NDA ला आणखी एक धक्का; भाजपने घेतला मोठा निर्णय

लोकसभेपूर्वी NDA ला आणखी एक धक्का; भाजपने घेतला मोठा निर्णय

लोकसभेच्या (Lok Sabha election ) पार्श्वभूमिवर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये भाजप (BJP) स्वतंत्र्य निवडणुक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. अकाली दलसोबत चर्चा फिस्कटल्याने भाजपने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आलं आहे. अकाली दल आणि भाजपामध्ये जागावाटपावरून बोलणी सुरु होती. अकाली दलाने २०१९-२० मध्येच भाजपाची साथ सोडली होती. परंतु पुन्हा काही वर्षांनी हे पक्ष एकत्र आले होते. शिवसेनेनंतर भाजपाची साथ सोडणारा अकाली दल हा दुसरा मोठा पक्ष होता. आता पुन्हा या दोन्ही पक्षांत बिनसले आहे.

लोकसभेच्या (Lok Sabha election ) पार्श्वभूमिवर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये भाजप (BJP) स्वतंत्र्य निवडणुक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. अकाली दलसोबत चर्चा फिस्कटल्याने भाजपने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आलं आहे. अकाली दल आणि भाजपामध्ये जागावाटपावरून बोलणी सुरु होती. अकाली दलाने २०१९-२० मध्येच भाजपाची साथ सोडली होती. परंतु पुन्हा काही वर्षांनी हे पक्ष एकत्र आले होते. शिवसेनेनंतर भाजपाची साथ सोडणारा अकाली दल हा दुसरा मोठा पक्ष होता. आता पुन्हा या दोन्ही पक्षांत बिनसले आहे. (BJP to contest Lok Sabha polls alone in Punjab)

शिरोमणी अकाली दलाने पंजाबमध्ये ९ जागा लढविण्याचा प्रस्ताव भाजपासमोर ठेवला होता. तर भाजपाला चार जागांची ऑफर दिली होती. मात्र दोघांच्या चर्चा समाधानकारक झाली नाही. यासंदर्भात भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी माहिती दिली.

नाशिक लोकसभे निवडणूक लढवण्यावर भुजबळ स्पष्टच बोलले

काय म्हणाले सुनील जाखड?

ट्विटर अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत पंजाबच्या लोकांच्या भल्यासाठी भाजपाने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. पंजाबमध्ये भाजपा एकट्याने निवडणूक लढविणार आहे. लोकांचे मत, पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मत, नेत्यांची मते जाणून घेऊन जवान, शेतकरी, व्यापारी आणि मजुरांच्या भविष्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्या आहे, असे जाखड यांनी म्हटले आहे.

2020 मध्ये शेतकरी आंदोलनानंतर अकाली दलने भाजपची साथ सोडली होती

2020 मध्ये शेतकऱ्यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन सुरू केले. केंद्रात अकाली दल आणि भाजप यांच्या युतीमुळे शेतकऱ्यांचा रोष स्थानिक नेत्यांवर निघत होता. शेतकऱ्यांनी भाजपच्या नेत्यांसह अकाली दलावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली होती.

कंगनाला घरातूनच मिळाले राजकीय बाळकडू; पणजोबांनी काँग्रेसकडून जिंकली होती निवडणूक

दरम्यान, 18 सप्टेंबर 2020 रोजी बादल कुटुंबाची सून हरसिमरत कौर बादल यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अकाली दलाने भाजपपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती.

अकाली दलपूर्वी बिजु जनता दलसोबत भाजपनं तोडली युती

ओडिशामध्येही भाजपाने बीजदसोबत युती तोडली होती. २१ पैकी ११ जागांची ऑफर पटनायक यांच्या बिजु जनता दलाने भाजपाला दिली होती. परंतु भाजपाला यापेक्षा जास्त जागा हव्या होत्या. यामुळे भाजपाने ही युती तोडली होती. आता पंजाब दुसरे राज्य ठरले आहे. मोदींना ४०० खासदारांचा आकडा गाठायचा आहे, यासाठी भाजप स्वबळावर लढण्याचा प्रयत्न करत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी