32 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeमहाराष्ट्र'राष्ट्रपती पोलीस शौर्य' पदकावर गडचिरोली पोलीस दलाची मोहर ; एकट्या गडचिरोलीत ३३...

‘राष्ट्रपती पोलीस शौर्य’ पदकावर गडचिरोली पोलीस दलाची मोहर ; एकट्या गडचिरोलीत ३३ जवानांना पदके

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी पोलीस पदके जाहीर केली जातात. यंदा महाराष्ट्रातील ७६ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदके जाहीर झाली आहेत. त्यात गडचिरोलीतील ३३ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील प्रवीण सांळुके, विनय कुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलिस अधिकाऱ्यांना विश‍िष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर करण्यात आले आहे.

नक्षली असलेल्या भागात नक्षल्यांशी मुकाबला करताना जीवाची बाजी लावून उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ३३ गडचिरोली पोलीस जवानांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला राष्ट्रपती कार्यालयाकडून देशभरात एकूण २२९ शौर्य पदके घोषित करण्यात आली. त्यात गडचिरोलीतील ३३ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील एकूण ९५४ पोलिसांना ‘पोलीस पदके’ जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ७६ पोलिसांना समावेश आहे.

‘राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक’ आणि ‘पोलीस शौर्य पदक’ ही पदके जीवन आणि मालमत्ता यांचे संरक्षण, गुन्हेगारीला पायबंद आणि गुन्हेगारांना अटक करण्यासाठी उल्लेखनीय शौर्यासाठी दिले जाते. विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ पोलीस सेवेतील खास उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाते. विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती, जयंत नाईकनवरे यांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा 
कळवा हॉस्पिटलचे ऑडिट करा; एसआयटी चौकशीची शिवसेना ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखाची मागणी

२२ रुग्णांचे बळी घेतल्यानंतर जिल्हा प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे झाले; शहरात लागले रुग्णालयाचे पोस्टर्स

६७५ खर्च करून १२२ वर्ष जुन्या ठाणे मेंटल हॉस्पिटलचा होणार मेकओव्हर; १५ दिवसात निविदा निघणार

पोलीस शौर्य पदकांमध्ये रोहित फार्णे, बाळासाहेब जाधव, सतीश पाटील, भास्कर कांबळे, कृष्णा काटे, द्रुग्साय आसाराम नरोटे, सुरपत वड्डे, संजय वाचामी, गौतम कांबळे, मोरेश्वर पुरम, मसरू कोरेटी, मुकेश उसेंडी, विनोद डोकरमारे, कमलाकर घोडाम, चंद्रकांत उके, महारु कुळमेथे, पोडा अत्राम, दयाराम वाळवे, प्रवीण झोडे, देविदास हलामी, दीपक मडावी, रामलाल कोरेटी, हेमंत कोडप, किरण हिचामी, वारलू अत्राम, माधव तिम्मा, नरेश सिदाम, रोहिदास कुसनाके, मुकिंद राठोड, नितेश दाणे, नागेश पाल, कैलाश कुळमेथे, प्रशांत बिटपल्लीवार यांचा समावेश आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी