29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रमंत्री जयंत पाटलांनी पुरग्रस्तांच्या काळजी पोटी जागविली रात्र

मंत्री जयंत पाटलांनी पुरग्रस्तांच्या काळजी पोटी जागविली रात्र

टीम लय भारी

मुंबई :- पश्चिम महाराष्ट्रात काल अतिवृष्टी झाल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे घरांची व शेतीची मोठी हानी झाली. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे फोन रात्रभर सुरूच होते. संपूर्ण रात्र त्यांनी अधिकाऱ्यांच्या संपर्कात घालवली आहे (Jayant Patil woke up at night to take care of the flood victims).

रात्रभर अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून कोल्हापूर, सांगली आणि सातारा भागातील पूरपरिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला आहे. जयंत पाटील काल रात्री मुंबईत होते. पण त्यांचे सारे लक्ष पुरग्रस्त भागाकडेच होते.

हवामान खात्याकडून रायगड, पालघरला ऑरेंज अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

‘चिपळूण शहराने पहिल्यांदाच पाहिला महाभयंकर पूर’

सातारा, सांगली, कोल्हापूरमधील पूर परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. त्यामुळे त्यांनी आज सकाळी सांगलीच्या दिशेने प्रयाण केले. पुण्यात काही वेळ थांबून ते इस्लामपूरला पोचणार आहेत. पुरामुळे त्यांनी पक्षाचे इतर कार्यक्रमही रद्द केले आहेत (He has also canceled other party functions due to the floods).

सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 59.6 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, शिराळा तालुक्यात 154.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने कृष्णा नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्याने सांगलीकरांवर पुन्हा एकदा 2019 च्या महापुराचे सावट निर्माण झाले आहे.

Jayant Patil woke up night to take care of flood victims
जयंत पाटील

पॉर्न फिल्मप्रकरणी राज कुंद्राबरोबर परप्रांतीय उमेश कामत आरोपी, बदनामी मात्र मराठमोळ्या उमेश कामतची !

Jayant Patil: Khadse being harassed unnecessarily by central agencies

पश्चिम महाराष्ट्रातील 2019 चा पूर आठवला की, अनेकांना झोप लागत नाही. मागच्या काही दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रात त्याच तीव्रतेचा पाऊस पडत आहे आणि पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. मागचा अनुभव लक्षात घेता नागरिकांचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

2019 च्या पूरादरम्यान जयंतराव पाटील यांच्या संपूर्ण कुटुंबांने झोकून काम केले होते. त्यात सतेज पाटील, विश्ववजीत कदम, धैर्यशील माने यांचाही सहभाग होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी