33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमुंबईपालघरच्या रचनात्मक विकासासाठी महाराष्ट्र चेंबर कटिबद्ध - ललित गांधी

पालघरच्या रचनात्मक विकासासाठी महाराष्ट्र चेंबर कटिबद्ध – ललित गांधी

देशाची औद्योगीक व आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला पालघर जिल्हा हा निसर्ग संपत्तीने नटलेला आणि तारापूरसारख्या औद्योगिक वसाहतीने काहीसा गजबजलेला असा आहे. मोठ्या प्रमाणावर आदिवासी लोकसंख्येचा हा जिल्हा असला तरी ३ औद्योगिक वसाहत सहकारी सस्थांमुळे व खासकरून कृषी औद्योगिक, मासेमारी आदींच्या निर्यातीमुळे एक आपली स्वतःची वेगळी ओळख सांगणारा प्रदेश आहे. अशा या पालघरमध्ये द्रष्टे उद्योगपती शेठ वालचंद हिराचंद यांनी सण १९२७मध्ये स्थापन केलेल्या व आपल्या कार्याची शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अँग्रिकल्चर या शिखर संस्थेचे पालघर जिल्हा कार्यालय येथील रचनात्मक विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील अशी हमी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सदरहू कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी दिली.

देशाची औद्योगीक व आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला पालघर जिल्हा हा निसर्ग संपत्तीने नटलेला आणि तारापूरसारख्या औद्योगिक वसाहतीने काहीसा गजबजलेला असा आहे. मोठ्या प्रमाणावर आदिवासी लोकसंख्येचा हा जिल्हा असला तरी ३ औद्योगिक वसाहत सहकारी सस्थांमुळे व खासकरून कृषी औद्योगिक, मासेमारी आदींच्या निर्यातीमुळे एक आपली स्वतःची वेगळी ओळख सांगणारा प्रदेश आहे. अशा या पालघरमध्ये द्रष्टे उद्योगपती शेठ वालचंद हिराचंद यांनी सण १९२७मध्ये स्थापन केलेल्या व आपल्या कार्याची शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अँग्रिकल्चर या शिखर संस्थेचे पालघर जिल्हा कार्यालय येथील रचनात्मक विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील अशी हमी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सदरहू कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी दिली.महाराष्ट्र चेंबरच्या रूपाने आणि मार्गदर्शनामुळे ज्या काही अनेक संधी नवउद्योजक, प्रस्थापित व्यापारी व कारखानदार, कृषी संबंधित सर्व व्यावसायिक आणि महिला उद्योजकांसह सर्वसामान्य सेवादारांना उपलब्ध होणार आहे त्या सर्वांचा पालघरवासियांनी लाभ घ्यावा आणि आर्थिक चळवळीचे एक उत्तम केंद्र म्हणून विकसित करावे असेही त्यांनी आवाहन केले.

महाराष्ट्र चेंबरसारख्या संस्था राज्याच्या आर्थिक विकासासाठी गेली अनेक वर्षे अभ्यासपूर्ण पद्धतीने सर्वांना सतत कार्यप्रवण करत असतात. महाराष्ट्रातीलच नव्हे तर जागतिकस्तरावरही ज्यांनी मोठे कर्तृत्व गाजवले आहे असे अनेक पदाधिकारी चेंबरमध्ये होते व आहेत. अशा आर्थिक चळवळीचा ध्यास असलेली महाराष्ट्र चेंबर हि संस्था पालघर येथे आपले कार्यालय सुरु करते आहे हि बाब विशेष महत्वाची आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आवश्यक ते सहकार्य मी देईन अशा भावना आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना व्यक्त केले.

वसई महानगर पालिकेचे प्रथम महापौर व उद्योजक राजीव पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये चेंबरच्या या कार्यालयामुळे येथील व्यापार उद्योग जगतातील ज्या काही विशिष्ट समस्या आहेत आणि विकासाचा नवा दृष्टिकोन आहे त्यासाठी चांगले मार्गदर्शन मिळेल व नवउद्योजकांना हे केंद्र आधारभूत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

याप्रसंगी आमदार हितेंद्र ठाकूर, वसई महानगर पालिका प्रथम महापौर व उद्योजक राजीव पाटील, एमएसएमइ डेव्हलपमेंट अँड फॅसिलीटेशन सेंटरचे सहाय्यक संचालक (मुंबई) सुनील खूनजारे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्री अँण्ड अँग्रिकल्चरच्या कार्यालयाचे विरार येथे उद्घाटन झाले
कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून टिमाचे अध्यक्ष वेलजी गोगरी, पीटीएमएफचे अध्यक्ष जयसिंग संखे, जिमाचे अध्यक्ष अशोक ग्रोवर, एनकेसीसीएचे अध्यक्ष दीपक चौधरी, एचडीआयएलचे अध्यक्ष गौतम दलाल, वसई इंडस्ट्री.चे अध्यक्ष अनिल आंबर्डेकर, वसई विकास सहकारी बँक लिमिटेडचे शिरीष राऊत, महाराष्ट्र चेंबरच्या उपाध्यक्षा सौ.शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब उपस्थित होते तसेच पालघर जिल्ह्यामधील विविध औद्योगिक ,कृषी ,वित्त ,सहकारी ,व्यापारी संस्थेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी चेंबरच्या उपाध्यक्षा सौ. शुभांगी तिरोडकर यांनी महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची विस्तृत माहिती दिली. पालघर कार्यालयाचे कार्यपद्धती सांगितली. महिला उद्योजकांनी देखील चेंबरच्या एकूण कार्यामध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
उद्योजकीय चर्चासत्र
यानिमित्ताने उद्योजकांना विशेष माहिती आणि मार्गदर्शन करण्यासाठी एक चर्चासत्र झाले. या चर्चासत्रामध्ये एमएसएमइ मंत्रालयाच्या वतीने (भारत सरकार) लघुत्तम, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी ज्या विविध योजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यांची सविस्तर माहिती एमएसएमइ डेव्हलपमेंट अँड फॅसिलीटेशन सेंटरचे सहाय्यक संचालक (मुंबई) सुनील खूनजारे यांनी यांनी दिली. तसेच एमएसएमइचे आर्थिक विकासातील योगदानही विशद केले. पावसकर यांनी विविध योजना बाबत चर्चा केली.
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन सौ बिंदा कन्ह्यालकर आणि अपर्णा क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निलेश घरत यांनी केले.
नियोजनामध्ये निकेत राऊत, तन्मय साखरे,सौ मानसी खानोलकर ,सौ प्रतिभा पाध्ये, अरुण राऊत यांनी सक्रिय सहभाग घेतला. पालघर जिल्हा कार्यालयास शुभेच्छा देवून कार्यक्रमाची सांगता झाली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या एकूण कार्याबाबत व संभासदवत घेण्यासंदर्भात चेंबरच्या मुख्य कार्यालयाशी ( 022-22855859-60/ email – [email protected] ) संपर्क साधावा.

महाराष्ट्र चेंबरच्या पालघर जिल्हा कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी मार्गदर्शन करतांना चेंबर अध्यक्ष ललित गांधी, समवेत आमदार हितेंद्र ठाकूर, माजी महापौर व उद्योजक राजीव पाटील, चेंबरच्या उपाध्यक्ष शुभांगी तिरोडकर, दीपा राऊत, एमएसएमइ डेव्हलपमेंट अँड फॅसिलीटेशन सेंटरचे सहाय्यक संचालक (मुंबई) सुनील खुजनारे आदी.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी