29 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे म्हणाले, ही संधी दवडू नका; कर्नाटक सीमाभागातील मराठी मतदारांना आवाहन

राज ठाकरे म्हणाले, ही संधी दवडू नका; कर्नाटक सीमाभागातील मराठी मतदारांना आवाहन

कर्नाटक निवडणुकीच्या प्रचाराची आज (दि.8) सांगता होत आहे. भाजप आणि काँग्रेसची येथे मोठी लढत होत असून भाजप, काँग्रेसचे दिग्गज नेते कर्नाटकात प्रचारासाठी उतरले आहेत. आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्रातून देखील अनेक नेते प्रचारासाठी कर्नाटकात गेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठींबा दिला असून ठाकरे गटाच्या नेत्यांनी कर्नाटकात महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार केला. खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी देखील कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर पत्रक काढले असून ते ट्विटरवर पोस्ट केले आहे. त्यामध्ये त्यांनी कर्नाटकच्या सीमाभागातील महाराष्ट्र एकीककरण समितीच्या उमेदवरांना आपला पाठींबा जाहीर केला आहे.

कर्नाटक सीमाभागातील मराठी बांधवांसाठी महाराष्ट्र नवनिर्मान सेना आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठींबा दिला असून राज्यात दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात असले तरी, मराठी भाषिकांसाठी कर्नाटकमध्ये दोन्ही पक्षांचे एकमत दिसून आले आहे. त्यामुळे सीमा भागातील मराठी भाषिक आता मतदानाच्या दिवशी कोणाच्या बाजूने मत देतात ते 13 मे रोजी निकाल लागल्यानंतर स्पष्ट होणार आहे.


राज ठाकरे यांनी मराठी मतदारांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्याच उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करताना, इतर पक्षांचे उमेदवार जरी मराठी असले तरी मराठी माणसांवर सीमाभागात होणाऱ्या अन्यायाविरोधात ते विधान भवनात तोंड उघडणार नाहीत. मतदारांना आवाहन करताना त्यांनी पुढे म्हटले आहे की, सीमाभागातील लोकांना १० मे ला संधी आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका.

गेले काही दिवस कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. भाजपचे दिग्गज नेते, काँग्रेसचे दिग्गज नेते प्रचारासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शाह, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मोठ्या सभा घेत कर्नाटक पिंजून काढला आहे. महाराष्ट्रातून देखील भाजप, काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते प्रचारासाठी कर्नाटकात तळ ठोकून आहेत.

हे सुद्धा वाचा

कोर्टाने ED, मोदी सरकारला झापले; नुसतेच आरोप, पुरावे शून्य!

IPL 2023: भर स्टेडियममध्ये चिअरलीडर्सचा छळ; व्हिडीओ व्हायरल

मुंबई विमानतळ रनवे जवळील भिंत कोसळली ,विमानतळाची सुरक्षा ऐरणीवर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील तेथे सभा घेतल्या. तर काँग्रेसचे अशोक चव्हाण, बंटी पाटील, पृथ्वीराज चव्हाण, प्रणिती शिंदे असे नेते तेथे प्रचारासाठी उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील कर्नाटकात पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरवले असून आज शरद पवार देखील निपाणीत प्रचारासाठी जाणार आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी