28 C
Mumbai
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्ररक्षाबंधन सणानिमित्त व्यापाऱ्यांकडून 'केक'चे लाल गाजर !

रक्षाबंधन सणानिमित्त व्यापाऱ्यांकडून ‘केक’चे लाल गाजर !

रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा साजरा केला जातो मात्र अलिकडे सणांचे स्वरुप दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणात बदलत चालले आहे. सणांना व्यापारी, बांडवली स्वरुप येत चालले आहे. भावा-बहिणींचा साधी राखी बांधून प्रेम व्यक्त करण्याच्या या दिवसाला आता अनेक व्यापारी, ई- कॉमर्स कंपन्या ऑफर्स देत आहेत. तशा अगदीच निकडीच्या गरजेच्या नसणाऱ्या वस्तुंसाठी देखील रक्षाबंधनाला देखील भावा कडून बहिणीला भेट वस्तुंचे गाजर व्यापारी वर्ग दाखवत आहे. अशा जाहिराती देखील समाज माध्यमांमध्ये मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत.

अलिकडे सण म्हणजे खऱेदी असेच भांडवलादर व्यवस्थेकडून ग्राहकांच्या मनावर बिंबवले जात आहे. दिवाळी, पाडवा, दसरा असा कोणताही सण असो मोठमोठ्या कंपन्यांच्या मोठमोठ्या जाहिराती, ऑफर्स ग्राहकांना भुलविण्यासाठी दिल्या जातात. त्यातही रोख रक्कम नसेल तर इएमआयचे फॅड देखील बिंबविले जाते. अनेक इ कॉमर्स कंपन्यांकडून ऑफर्सची मोठी धूळदाण केली जाते. ग्राहक बिचारे सण उत्सवाचे स्वरुप विसरून खरेदी म्हणजेच सण, खरेदी म्हणजेच उत्सव अशा चक्रात अडकून जातो.

हे सुद्धा वाचा
जयंत पाटील यांनी सरकारची केली कानउघाडणी!

आशिया चषक २०२३: राहूल द्रविडने फोडली मोठी बातमी!
मंत्रालयाच्या इमारतीवरुन उड्या मारुन धरणग्रस्तांचा आत्महत्येचा प्रयत्न

आता रक्षाबंधनाच्या सणाला देखील अशा अनेक ऑफर्स इ कॉमर्स कंपन्यांकडून दिल्या जात आहेत. अगदी विमानाचे तिकीट बुकिंग, सिनेमाचे तिकीट बुकींग, टीव्ही, कपडे, दागिने, मेकअप साहित्य अशा अनेक वस्तुंवर सुट देऊन ई कॉमर्स कंपन्या ग्राहकांना आकर्षित करत आहेत. इतकेच काय तर छोटे व्यापारी दुकानदार देखील ऑफर्स देत असून खाद्य पदार्थांपासून ते कपड्यांपर्यत वस्तूंवर सुट देत आहेत. ”रक्षा बंधनाच्या सणाला लाडक्या बहिनीला गिफ्ट करा १०० टक्के व्हेज केक” अशा ऑफर्सच्या जाहिराती छोटे छोटे व्यापारी देखील करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी