29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्र‘पेगॅसस’ भानगडीमुळे ‘ईव्हीएम’ घोटाळ्याला फुटली वाचा

‘पेगॅसस’ भानगडीमुळे ‘ईव्हीएम’ घोटाळ्याला फुटली वाचा

टीम लय भारी

नवी दिल्ली :-  इस्त्रायलच्या ‘पेगॅसस’ या हेरगिरी तंत्रज्ञानाचे पडसाद भारतात जोरदार उमटले आहेत. ‘पेगॅसस’चे बोट धरून आता ‘ईव्हीएम’ घोटाळ्याने पुन्हा डोके वर काढले आहे. या संशयाला चालना दिली आहे, भाजपच्याच एका माजी मंत्र्याने (Read the EVM scandal caused by the Pegasus scandal).

‘पेगॅसस’ तंत्रज्ञानाच्या आधारे कोणत्याही व्यक्तीच्या मोबाईलमध्ये फेरफार करता येतो. मग ‘ईव्हीएम’मध्येही हा फेरफार करणे शक्य आहे. त्यामुळे मतपत्रिकेद्वारेच निवडणुका घेण्याचा निर्णय तात्काळ व्हायला हवाट, असा मुद्दा माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी उपस्थित केला आहे (This issue has been raised by former Finance Minister Yashwant Sinha).

काय आहे पेगासस स्पायवेयर आणि ते कसे काम करते?

भारतीय गोलंदाजांचा फलंदाजीत धडाका

भारतीय जनता पक्षाला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पाशवी बहुमत मिळाले होते. त्या अगोदरही भाजपने अनेक निवडणुकांमध्ये यश मिळविले होते. भाजपला आश्चर्यकारकपणे मिळत असलेल्या या यशामुळे ईव्हीएमवर अनेकदा संशय व्यक्त केला गेला आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने मात्र हा संशय यापूर्वीही फेटाळून लावला आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करून दाखवा, असे आव्हानही आयोगाने दिले होते. यशवंत सिन्हा यांनी आता ताजा आक्षेप नोंदवला आहे. हा आक्षेप कुणालाही सहजपणे पटण्यासारखा आहे.

Read the EVM scandal caused by the Pegasus scandal
पेगॅसस

सुजय विखेंनी निलेश लंकेंना लगावला खोचक टोला

What the Pegasus surveillance scandal means for Indian democracy

‘पेगॅसस’ तंत्रज्ञानामुळे लोकांच्या हातातील मोबाईलमध्ये गुपचूपपणे हव्या तशा भानगडी करता येतात. मग ‘ईव्हीएम’मध्येही या भानगडी निश्चितच करता येतील (Then in EVM too, this mess can definitely be done).

नरेंद्र मोदी सरकारने इस्त्राईलच्या मदतीने ‘पेगॅसस’ तंत्रज्ञान वापरल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे मोदी सरकारने निवडणूक आयोगाला हाताशी धरून ‘पेगॅसस’च्याच धर्तीवर ‘ईव्हीएम’साठीही असे तंत्रज्ञान वापरलेले असू शकते, असा संशय आता आणखी बळकट झाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी