33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रRSS शतक वर्षपूर्तीनिमित्त कार्यविस्तारावर भर; 1 लाखाहून अधिक ठिकाणी शाखा सुरू करण्याचा...

RSS शतक वर्षपूर्तीनिमित्त कार्यविस्तारावर भर; 1 लाखाहून अधिक ठिकाणी शाखा सुरू करण्याचा मानस

कोरोनामुळे शाखा बंद झाल्या होत्या तर वर्षभर अनेक ठिकाणी प्रत्यक्ष शाखा भरल्याच नाहीत. त्यामुळे संघाने शाखावाढीवर विशेष भर दिला असून संघाच्या शतक वर्षपूर्तीनिमित्त कार्यविस्तारावर भर असणार आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) वार्षिक सर्वसाधारण सभेची तीन दिवसीय बैठक रविवारपासून हरियाणातील पट्टिकल्याना, समलखा येथील सेवा साधना आणि ग्राम विकास केंद्रात सुरू झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे उद्घाटन केले. स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होणार असल्याने 2025 पर्यंत एक लाखाहून अधिक ठिकाणी शाखा सुरू करण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मानस आहे. (RSS Intention to open branches in more than one lakh locations)

कोरोनामुळे शाखा बंद झाल्या होत्या व वर्षभर अनेक ठिकाणी प्रत्यक्ष शाखा भरल्याच नाही. संघाने शाखावाढीवर विशेष भर दिला असून संघाच्या शतक वर्षपूर्तीनिमित्त कार्यविस्तारावर भर आहे. संघ स्थान आणि शाखांची संख्या वाढीस लागावी, यासाठी संघाकडून सातत्याने विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत असल्याचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केले. यादृष्टीने संघाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत असून, कोरोनानंतर दोनच वर्षांत देशपातळीवर संघाच्या शाखांमध्ये जवळपास 13 हजारांनी वाढ झाली आहे. जर टक्केवारीच्या हिशेबाने पाहिले तर ही वाढ 23 टक्के इतकी असून, आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे. मार्च 2019 मध्ये संघाच्या 59 हजार 266 शाखा होत्या.

rss-intention-to-open-branches-in-more-than-one-lakh-locations

यावेळी डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले की, संपूर्ण भारताचा समाज एक आहे. सर्व समान आहेत. सर्व माझे आहेत. मला समाजाचे काही देणे लागतो, अशा भावना आणि मूल्ये संघाच्या शाखेतून येतात. संघाचे स्वयंसेवक आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून आणि स्वत:च्या खिशातून समाजपरिवर्तनात हातभार लावण्यासाठी संघाच्या कार्याचा विस्तार करतात. संघाच्या शाखेतून एक व्यक्ती तयार होते, जी पुढे समाजात राष्ट्रीय विचार जागृत करून समाजाला सोबत घेऊन सामाजिक परिवर्तनाची भूमिका बजावते.

 

या बैठकीत देशभरातील 34 संघटनांचे 1474 प्रतिनिधी सहभागी होत आहेत. प्रतिनिधी सभेच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना डॉ.मनमोहन वैद्य म्हणाले की, 2025 मध्ये संघ आपल्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण करणार आहे. त्यांनी सांगितले की, संघ सध्या 71355 ठिकाणी थेट काम करत आहे आणि सामाजिक परिवर्तनाच्या महत्त्वपूर्ण कार्यात आपली भूमिका बजावत आहे. पुढील एक वर्षापर्यंत एक लाख ठिकाणी पोहोचण्याचे संघाचे उद्दिष्ट आहे. 2020 मध्ये कोरोनाच्या आपत्तीनंतरही संघाचे कार्य वाढले आहे. 2020 मध्ये 38913 ठिकाणी 62491 शाखा, 20303 ठिकाणी साप्ताहिक सभा आणि 8732 ठिकाणी मासिक सभा झाल्या.

हे सुद्धा वाचा : 

राज्यातील मंत्र्यांसाठी RSS घेणार शिकवणी वर्ग !

शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी फडणवीसांचा ‘जुन्या पेन्शन’चा डाव!

हिंदुत्ववाद्यांच्या मैदानात राहुल गांधींनी केले नरेंद्र मोदींना चीतपट!

युवकांमध्ये RSS रुची

लोकसंघ डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे तरूणांना संघाशी जोडण्याची विनंती करत आहेत. 2017 ते 2022 पर्यंत संघाला RSS मध्ये सामील होण्यासाठी 7,25,000 विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. यातील बहुतांश 20 ते 35 वयोगटातील तरुण आहेत, ज्यांना समाजसेवेसाठी संघात सामील व्हायचे आहे. दैनंदिन शाखांमध्येही तरुणाईची आवड वाढत आहे. संघाच्या 60 टक्के शाखा या विद्यार्थ्यांच्या शाखा आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी