28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रमालोजराचे छत्रपती राजेंना पाडण्यासाठी आणि आता शाहू छत्रपती राजेंच्या विजयासाठी

मालोजराचे छत्रपती राजेंना पाडण्यासाठी आणि आता शाहू छत्रपती राजेंच्या विजयासाठी

तर विरोधकांच्याकडून 2009 च्या विधानसभेच्या निवडणुकीत मालोजराचे छत्रपती यांच्या या वारसांना विरोध का केला असा प्रश्न विरोधक विचारत आहेत

मालोजराचे छत्रपती राजेंना पाडण्यासाठी आणि आता शाहू छत्रपती राजेंच्या विजयासाठी

प्रशांत चुयेकर

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात, महाविकास आघाडीतून शाहू छत्रपती यांना उमेदवारी दिली आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराचा वारसा पुढे नेणारे यांना विजयी करा, असं आवाहन महाविकास आघाडीतून प्रमुख नेते काँग्रेसचे  जिल्हाध्यक्ष, सतेज पाटील यांनी केलं. तर विरोधकांच्याकडून 2009 च्या विधानसभेच्या निवडणुकीत मालोजराचे छत्रपती यांच्या या वारसांना विरोध का केला असा प्रश्न विरोधक विचारत आहेत. पूर्वी राजेंच्या विरोधात तर आता राजेंच्या सोबत अशी टीका ,आमदार सतेज पाटील यांच्यावर का झाली आहे याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील करवीर मधून उभे होते. यावेळी त्यांच्या विरोधात माजी मंत्री दिग्विजय खानविलकर होते. याच विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर शहरातून खानविलकर यांचे जावई मालोजी राजे छत्रपती निवडणुकीसाठी उभे होते.

पाटील हे कसबा बावडा कोल्हापूर शहर ,विधानसभा मतदारसंघात राहतात. कसबा बावडा परिसरात सहा नगरसेवक निवडून येतात ते पाटील यांचेच. कोल्हापूर शहरात सुद्धा पाटील यांना मानणारा मतदार आहे.
दिग्विजय खानविलकर करवीर मधून पाटील यांना विरोध करत असतील तर कोल्हापूर शहरात त्यांचे जावई मालोजीराजे यांना का मदत करायची असा प्रश्न पाटील यांच्या कार्यकर्त्यांना पडला. साहजिकच त्यांच्या विरोधातिल सूर हा मालोजिराजे यांचा पराभवास कारणीभूत ठरला. म्हणूनच आज पाटील यांना विरोधक 2009 च्या निवडणुकीत राजेंना का मदत केली असा प्रश्न विचारत आहेत.

तर दुसरीकडे विरोधक असलेले भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी शाहू यांच्या विचारांचे वारसदार संभाजीराजे  यांना पाडण्यासाठी मदत केली असल्याचा आरोप आहे. 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस मधून  धनंजय महाडिक यांना डावलून संभाजी राजे छत्रपती यांना उमेदवारी दिली होती. याचा राग म्हणून महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी संभाजीराजे यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न केला असल्याचा सुद्धा महाडिक यांच्यावर आरोप केला जात होता.
मालोजीराजे छत्रपती यांचा पराभव करणारे कार्यकर्तेच आज त्यांचे वडील शाहू छत्रपती यांना खासदार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यामुळे या मतदारसंघात आता वेगळीच ईर्षा निर्माण होत आहे.
पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, दूधगंगा  सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अशा विविध माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे जाळ निर्माण केलेला आहे. त्यामुळे शाहू छत्रपती यांचा विजय करण्यासाठी त्यांची मोलाची कामगिरी असणार आहे.
खासदार धनंजय महाडिक यांनी विधानसभेच्या निवडणुकीत दगा दिल्यामुळे त्यांनी संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. विजयाचा सिंहाचा वाटा पाटील यांचा होता म्हणूनच ते विजयी झाले. आज त्यांच्याच पराभवासाठी ते सक्रिय झाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी