28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रम्हणून रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळताच 200 जणांनी दिली सोडचिठ्ठी

म्हणून रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळताच 200 जणांनी दिली सोडचिठ्ठी

राज्यात लोकसभेचं बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. भाजपनं (BJP) लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहिर होण्यापूर्वी रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे(Raksha Khadse) यांना पुन्हा उमेदवारी दिली. मात्र, भाजपमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. रक्षा खडसे यांच्याविरोधात जात भाजपच्या शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारींनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती समोर आली आहे.(BJP Raksha Khadse loksabha ticket 200 party workers resign in jalgon)

रक्षा खडसेंच्या (Raksha Khadse) उमेदवारीला वरणगाव शहरातून तीव्र विरोध होत आहे. रक्षा खडसेंच्या उमेदवारी विरोधात 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत.

भाजपने देशात अनेक ठिकाणी विद्यमान खासदारांचे तिकिट कापले आहे. बहुतांश खासदारांचा पत्ता कट करण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली गेल्याने रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

अजित पवार यांना माजी आमदाराने झोडपले

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपली नाराजी उघड व्यक्त करत राजीनामेही दिले आहेत. रविवारी तब्बल 200 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे राजीनामे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवले आहेत.

म्हणून रक्षा खडसेंना भाजप नेत्यांचा तीव्र विरोध

खासदार रक्षा खडसे या भाजप कार्यकर्त्यांऐवजी राष्ट्रवादीर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मदत करतात असा आरोप रावेरमधील भाजप कार्यकर्ते आणि पादधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी म्हटलं की, मंत्री गिरीश महाजन यांना खडसे परिवाराकडून वारंवार टार्गेट केले जाते. मात्र खासदार रक्षा खडसे यांच्या कडून साधे उत्तर सुद्धा दिले जात नाही. दहा वर्षांत निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी