29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे दिल्लीत जाताच शरद पवारांच्या गटात खळबळ; रोहित पवारांनी दिली ऑफर

राज ठाकरे दिल्लीत जाताच शरद पवारांच्या गटात खळबळ; रोहित पवारांनी दिली ऑफर

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठी उलथापालथ सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) भाजपसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच राज ठाकरे (Raj Thackeray) दिल्ली दौऱ्यावर आहेत. भाजप आणि मनसे युतीची बोलणी आता अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी राज ठाकरे यांना मोठी ऑफर दिली आहे.  राज ठाकरे (Raj Thackeray)  सोमवारी रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाले असून, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांची भेट होण्याची शक्यता आहे. राज्यातील महायुतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहभागी व्हावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार प्रयत्न सुरू आहेत.(Raj Thackeray Delhi Visit sharad pawar group give offer)

दरम्यान आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र धर्माचे पालन करण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, असे म्हटलं आहे.

म्हणून रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळताच 200 जणांनी दिली सोडचिठ्ठी

काय म्हणाले रोहित पवार?

मी देखील राज ठाकरे यांच्या भाषणांचा फॅन आहे. त्यांनी मविआ सोबत यावं ही आपली इच्छा आहे. भाजपसोबत जाण्याआधी त्यांनी विचार करावा. 2019 मध्ये भाजपने छोट्या पक्षांना फाट्यावर मारले होते. हे लक्षात घ्यावे. आता भाजपसोबत असलेल्या दोन पक्षांचा त्यांना फायदा दिसत नाही, म्हणून छोट्या पक्षांना भाव देत आहेत.

महाराष्ट्र धर्माचे पालन करण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांना माजी आमदाराने झोडपले

महाराष्ट्रातील जनता भाजपसोबत नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. यामुळे भाजप लहान-लहान पक्षांना सोबत घेऊन मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. दोन पक्ष फोडूनही या दोन्ही पक्षांचा काही उपयोग नसल्याचे त्यांच्या ध्यानात आले आहे. यामुळे ज्या पक्षांना पाच वर्षांपूर्वी महत्व दिले जात नव्हते, त्यांची आठवण आता भाजपला झाल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आरएसएसने देखील भाजप आणि मनसे युतीला हिरवा झेंडा दाखवल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर आता भाजपकडून मनसेसोबत युतीसंदर्भातील हालचालींना वेग आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी