28 C
Mumbai
Monday, July 8, 2024
Homeमहाराष्ट्रशिरूरच्या तहसिलदरांची दबंग कामगिरी, वाळू तस्करांवर धडाकेबाज कारवाई

शिरूरच्या तहसिलदरांची दबंग कामगिरी, वाळू तस्करांवर धडाकेबाज कारवाई

टीम लय भारी

पुणे :- शिरुरच्या दबंग तहसीलदार लैला शेख यांनी टाकळी हाजी, संविदने पाठोपाठ भांबर्डे तालुका शिरूर येथे ही वाळू तस्करी होत असलेल्या तळ्यात रात्रीचा छापा मारीत एक जेसीबी मशिन सह वाळूने भरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेतला असून अंत्यत घनदाट जंगल परीसरात तहसीलदार यांच्यासह महसुलच्या अवघ्या चार कर्मचाऱ्यांनी धाडसी कारवाई केल्याने तस्करांची धाबे दणाणले असुन जनते मधून कौतुक होत आहे.

याबाबत तहसीलदार लैला शेख म्हणाल्या की, भाबर्डे येथील तळ्यात गेल्या अनेक दिवसा पासून वाळू तस्करी सुरु असल्या बाबतच्या तक्रारी येत होत्या. तीन वेळा महसूल पथकाने त्या ठिकाणी छापा मारला, मात्र तस्करांना खबर मिळाल्यांने ते तेथून पलायन करण्यास यशस्वी झाले होते. याबाबत रांजणगाव गणपती पोलिस स्टेशनला ही वाळू तस्करी सुरु असल्या बाबतचे पत्र दिले होते. या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा अवैध रित्या सुरु होता. रात्री कोणते ही पोलिस संरक्षण न घेता तहसीलदार स्वतः जिवाची पर्वा न करता कारवाई करीत असल्याने जनते मधून त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. पथक दाखल होताच पलायन करणाऱ्या जेसीबी आणि वाळूने भरलेला ट्रॅक्टर पथकाने पकडला. या कारवाई मध्ये तलाठी के. एम. जाधव, एस. बी. शिंदे, दशरथ रोडे, सुशीला गायकवाड सहभागी झाले होते. मागील आठवड्यात त्यांनी टाकळी हाजी तसेच संविदने येथे कारवाई केली होती. त्यांनी वर्षभरात शेकडो कारवाई करीत कोट्यावधी रुपयाचा दंड तस्करांना ठोठावला असल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत तहसीलदार लैला शेख म्हणाल्या की, तालुक्यात ज्या ठिकाणी वाळू तस्करी सुरु असेल त्याबाबत जनतेने मला मोबाईल किंवा अर्जादारे कळवावे त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल त्यामुळे शासन आणि पर्यावरण यांची होणारे नुकसान टाळण्यास मदत होईल.

तहसीलदारांची पोलिस संरक्षणाची मागणी…

वाळू तस्करांच्या वर कारवाई ही रात्रीची करावी लागते त्यातून वाळू तस्कर आणि त्यांचे मोहरके यांच्या मुळे कारवाई करताना माझ्या जिवीताला धोका होण्याची शक्यता असून मला पोलिस संरक्षण मिळावे अशी मागणी तहसीलदार लैला शेख यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक पुणे यांच्याकडे केली आहे.

तहसीलदार लैला शेख या आपल्या दोन वर्षाच्या लहान बाळाला घरी ठेऊन रात्रीची जिवाची पर्वा न करता निममुष्य परीसरात धाडसी कारवाई करीत असल्याने त्यांच्या धाडसा बदद्ल जनते मधुन कौतुक होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी