27 C
Mumbai
Monday, July 8, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक : ‘या’ अभिनेत्रीसह कुटुबियांना कोरोनाचा विळखा!

धक्कादायक : ‘या’ अभिनेत्रीसह कुटुबियांना कोरोनाचा विळखा!

टीम लय भारी

मुंबई : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही सीरियलमध्ये प्रसिध्द अभिनेत्री मोहिना कुमारी सिंगलाही (Mohena Kumari Singh) कोरोनाव्हायरसची (coronavirus) लागण झाली आहे. मोहेनाचं कुटुंबच कोरोनाव्हायरसच्या विळख्यात सापडलं आहे. मोहिना कुमारीसह तिच्या कुटुंबातील 5 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यामुळे मोहिनीच्या कुटुंबियांना एकच धक्का बसला आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या टीव्ही सीरियलमधीन मोहिनाला  प्रसिद्धी मिळाली होती. नुकतंच तिचं लग्न झालं. त्यानंतर आपल्या सासरच्या मंंडळींसोबत ती राहते आहे. तिच्यासह पती, सासू-सासरे आणि कुटुंबातील इतर दोघांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. त्यांच्यामध्ये दिसणारी लक्षणं सौम्य आहेत. त्यांना ऋषिकेशमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मोहिनानं माध्यमांशी बोलताना सांगितलं, “सुरुवातीला तिच्या सासूला ताप आला. आधी त्यांची टेस्ट नेगेटिव्ह आली. त्यामुळे त्यानंतर आम्ही सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र त्यानंतर त्यांचा ताप कमी होत नाही हे आम्हाला दिसलं. मग आम्ही सर्वांनीच कोरोना टेस्ट केली. आमच्या घरातील बहुतेकांना कोरोनाची लागण झाली असल्याचं निदान झालं, आमच्यात लक्षणं नव्हती”

मोहिना ही राजघराण्यातील आहे. मध्य प्रदेशातील रेवाचे राजा पुष्पराज सिंग यांची ती कन्या. रेवाची राजकुमारी असलेल्या मोहिनाचं नुकतंच लग्न झालं. हरिद्वारमध्ये थाटात तिचा विवाहसोहळा पार पडला.

यापूर्वी बॉलीवूडमध्ये यांना झाली कोरोनाची लागण...

बॉलीवूडमध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वात आधी सिंगर कनिका कपूर ही कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर निर्माता करीम मोरानी आणि त्यांच्या दोन्ही मुली जोआ मोरानी, शाजिया मोरानी कोरोना संक्रमित आढळल्या होत्या. तर किरण कुमार यांनाही व्हायरसची लागण झाली होती. विशेष म्हणजे आता सर्वजण कोरोनामुक्त झाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी