30 C
Mumbai
Monday, March 20, 2023
घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रAaditya Thackeray यांच्या सभांमुळे शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली

Aaditya Thackeray यांच्या सभांमुळे शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली

आदित्य ठाकरे यांच्या सभांना राज्यभरात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. केवळ शिवसैनिकच नव्हे तर सामान्य लोकांचीही आदित्य ठाकरे यांच्या सभांना गर्दी होत आहे. सामान्यांकडून वाढत जाणारा प्रतिसाद पाहून शिवसेनेतील पलायनवादी आमदारांची पाचावर धारण बसली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत पाठणचे (सातारा) आमदार व माजी राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पलायन केले होते. त्यांना आता कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी चर्चा आहे. याच दरम्यान आदित्य ठाकरे यांनी शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात मंगळवारी जोरदार सभा घेतली.
आदित्य ठाकरे यांच्या सभेचा तडाखा इतका जबरदस्त होता की, त्यामुळे शंभूराज देसाई कमालीचे बैचेन झाले. आदित्य ठाकरे यांच्या सभेला सात – आठ हजारांची उपस्थिती असू शकेल असे देसाई यांनी मान्य केले. पण या सभेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठविलेली माणसे होती, अशी सारवासारव शंभूराज देसाई यांनी केली आहे.
आदित्य ठाकरेंच्या सभेपेक्षा मी ५० पट गर्दी जमवून दाखवतो. मी एकनाथ शिंदे यांना पाठण मतदारसंघात बोलवणार आहे. त्यावेळी या सभेला मोठी गर्दी जमवून दाखवेन, असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

VIDEO : शंभूराज देसाईंचे कार्यकर्ते खवळले, गद्दार कुत्र्यांनो अडीच वर्षे पदे घेताना लाज वाटली नाही का ?

शिवसेनेत सतत कारस्थाने करणाऱ्या शंभूराज देसाईंना पक्षाची नोटीस

महादजी शिंदेंसमोर दिल्लीचा बादशहा मुजरा करायचा, एकनाथ शिंदे दिल्लीत जाऊन कुर्निसात करतात, हरी नरके यांची टीका

मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळावा यासाठी शिंदेगटाचे खासदार अमित शहांना भेटले

आदित्य ठाकरेंचा झंझावात, शिंदे गट हवालदिल

आदित्य ठाकरे यांनी बेधडकपणे सभा घेण्यास सुरूवात केली आहे. ‘लहान पोरगं’ म्हणून आदित्य ठाकरे यांच्याकडे शिंदे गटाकडून सुरूवातीला दुर्लक्ष केले जात होते. पण ठाकरे यांनी आपण लहान असलो तरी कसलेले आहोत, हे दाखवून दिले आहे.
कणकवली, कोल्हापूर, सातारा व पुणे अशा बंडखोरांच्या मतदारसंघांत आदित्य ठाकरे यांनी जोरदार सभा घेतल्या आहेत. बंडखोर आमदारांवर आदित्य ठाकरे शेलक्या शब्दांत झोड उठवित आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची भाषणे ऐकण्यासाठी सामान्य लोकांकडूनही प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
आदित्य ठाकरे यांच्या सभांना असाच प्रतिसाद मिळत राहिला तर शिंदे गटाची अवस्था बिकट होईल. कारण बंडखोरांच्या बालेकिल्ल्यात घुसून आदित्य ठाकरे यश मिळवत असतील तर भविष्यात विविध निवडणुकांमध्ये ते बंडखोरांना पाणी पाजू शकतील, याचे हे संकेत मानले जात आहेत.

बंडखोरांवर सोशल मीडियात चिखलफेक सुरूच

भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड नाट्य सामान्य जनतेला बिल्कूल आवडलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियात थोडे जरी डोकावले तरी शिंदे गटातील आमदारांवर सामान्य लोकांकडून शिव्या शाप दिले जात असल्याचे दिसत आहे. याउलट उद्धव ठाकरे यांना सामान्य जनतेमध्ये सहानुभूतीची लाट असल्याचे दिसत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी