27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रपुण्यात चंद्रकांत पाटलांचे तोंड काळे; महापुरुषांच्या अवमानाविरोधात कार्यकर्त्यांनी केली शाईफेक !

पुण्यात चंद्रकांत पाटलांचे तोंड काळे; महापुरुषांच्या अवमानाविरोधात कार्यकर्त्यांनी केली शाईफेक !

उठसूठ महापुरुषांच्या अवमानाचे धोरण ठरविलेल्या भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांचे तोंड काळे केले गेले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळांसाठी लोकांकडे भीक मागितली, असली भिकार भाषा वापरणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर एका संतप्त कार्यकर्त्याने शाई फेकून त्यांचे तोंड काळे केले.

पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये पाटील हे आज मोरया गोसावी महोत्सव कार्यक्रमासाठी आलेले होते. भाजप कार्यकर्त्याच्या घरी ते काही वेळ थांबले होते. त्या कार्यकर्त्यांच्या घराबाहेर पडत असतानाच चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाईफेक करण्यात आली. यानंतर परिसरात गोंधळ उडाला. पाटील यांच्या चेहऱ्यावर शाईफेक करणाऱ्यासह घोषणाबाजी करणाऱ्या आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शाळा सुरू करण्यासाठी सरकारी अनुदानावर का अवलंबून राहता? डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी लोकांकडे भीक मागितली होती, असली भिकार भाषा चंद्रकांत पाटलांनी वापरली होती. या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज राज्यभर निषेध आंदोलने करण्यात येत आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातही निषेध आंदोलने सुरू असतानाच पाटील संतप्त आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या तडाख्यात सापडले. त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

या महापुरुषांनी लोकवर्गणी जमवली होती. सरकारकडे शिक्षण क्षेत्रासाठी पैसा नसेल तर सरकारनेच भीक मागावी, अशा संतप्त भावना राज्यभरातून व्यक्त होत आहेत. त्यातच पुण्याच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्दामपणाची, दमबाजी करणारी, मग्रूर भाषा वापरली, असाही आक्षेप घेतला जात आहे. आपण दिलगिरी व्यक्त करूनही हे प्रकार थांबू नयेत, असे दुर्दैव असल्याचे पाटील म्हणाले. मात्र, पाटील यांच्या दिलगिरीची भाषाही योग्य नसल्याचा कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे. कुणाला अवमान झाला वैगेरे वाटत असेल, ही जी पाटील यांची भाषा आहे, त्यातून त्यांना आपल्या कृतीचा आजिबात पश्चाताप झालेला नसल्याचेच दिसते. शिवाय, आज शाईफेकीनंतर धमकावणारी त्यांची आव्हानाची भाषा एका नेत्याला शोभणारी नाही, असेही कार्यकर्ते म्हणत आहेत.

हे सुद्धा वाचा :

Nana Patole;छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींना तात्काळ हटवा!; नाना पटोलेंची मागणी

Chandrakant Patils Face Blackened, चंद्रकांत पाटलांचे तोंड काळे, महापुरुषांच्या अवमानाचे धोरण

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी