27 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरव्यापार-पैसा‘टाटा’ आता सेमीकंडक्टर प्रॉडक्शन करणार; येत्या पाच वर्षांत करणार 7.4 लाख कोटींची...

‘टाटा’ आता सेमीकंडक्टर प्रॉडक्शन करणार; येत्या पाच वर्षांत करणार 7.4 लाख कोटींची गुंतवणूक

भारतीय उद्योग क्षेत्रातील आघाडीचा टाटा ग्रुप आता आणखी एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. येणाऱ्या काही वर्षात टाटा ग्रुप सेमीकंटक्टरचे प्रोडक्शन सुरू करणार आहे.

भारतीय उद्योग क्षेत्रातील आघाडीचा टाटा ग्रुप आता आणखी एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. येणाऱ्या काही वर्षात टाटा ग्रुप सेमीकंटक्टरचे प्रॉडक्शन सुरू करणार आहे. टाटा ग्रुप येत्या पाच वर्षांमध्ये 7.4 लाख कोटी रुपये गुंतवणुक सेमीकंटक्टर उत्पादन क्षेत्रात करणार आहे. लोखंड-पोलाद, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन उद्योग अशा अनेक क्षेत्रात भारतात आणि जगभरात देखील आघाडीचा ब्रॅंड असलेला टाटा ग्रुप सेमीकंडक्टर क्षेत्रात पाऊल ठेवत असून त्यामुळे रोजगार निर्मितीला देखील चालना मिळू शकेल.

नुकतेच टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी जपानच्या एका वृत्तपत्राला मुलाखतीत सांगितले की, टाटा ग्रुप भारतात मीठा पासून लोखंड,पोलादाच्या क्षेत्रात अनेक उत्पादने बनवतो. आता टाटा ग्रुपने सेमीकंडक्टर्सचे उत्पादन सुरू केले तर तो जागतिक स्तरावर सेमीकंडक्टर पुरवठा साखळीचा महत्त्वाचा भाग बनेल. तसेच टाटा इलेक्ट्रिक वाहनांसारख्या क्षेत्रात आणखी काही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असल्याचे देखील त्यांनी मुलाखती दरम्यान सांगितले.

नटराजन चंद्रशेखरन म्हणाले की, टाटा समूह देशात टाटा इलेक्ट्रॉनिक्स निगडीत सेमीकंडक्टर असेंबली चाचणी व्यवसाय सुरू करण्याच्या योजनेवर विचार करत आहे. 2020 मध्ये टाटा समूहाने इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स बनवण्यासाठी टाटा इलेक्ट्रॉनिक्सची स्थापना केली होती. मुलाखतीत नटराजन चंद्रशेखरन म्हणाले की, सेमीकंडक्टर उद्योग निर्मितीबाबत टाटा ग्रुप वेगवेगळ्या संस्थांसोबत देखील चर्चा करत असून  एक अपस्ट्रीम चिप फॅब्रिकेशन प्लॅटफॉर्म लॉन्च केला जाऊ शकतो. टाटा ग्रुप पुढील 5 वर्षांत सुमारे 7.4 लाख कोटी रुपये गुंतवणुकीची योजना आखली आहे.

हे सुद्धा वाचा
प्रसिद्धीलोलुप शहाजी पाटील कार्यकर्त्यांना म्हणतात, चारचौघांत डॉयलॉग मारून मला आणखी फेमस करा; ऑडिओ क्लिप व्हायरल!

ईशान किशनने रचला इतिहास; डबल सेंच्युरी करुन दिग्गजांचे तोडले रेकॉर्ड

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नातील गेस्ट लिस्ट आली समोर

भारत सध्या इतर देशांवर अवलंबून

स्मार्ट फोन पासून फायटर जेट्स, वाहने, स्पेस इक्वूपमेंट्स, सुपर कंप्यूटर अशा अनेक गॅझेट्समध्ये सेमीकंडक्टरचा वापर होतोच. भारतात सेमीकंडक्टर उद्योग अद्याप नाहीत. भारतातील अनेक कंपन्यांना त्यांच्या उपकरणांसाठी आवश्यक सेमीकंडक्टर इतर देशांकडूनच आयात करावी लागतात. त्यामुळे येत्या काळात टाटा ग्रुपने या क्षेत्रात पाऊल ठेवल्यास भारतात सेमीकंडक्टरची निर्मिती होऊ शकते आणि भारताला इतर देशांवर देखील सेमीकंडक्टरसाठी अवलंबून रहावे लागणार नाही. भारतीय अर्थव्यवस्थेवर देखील त्याचा चांगला परिनाम होऊ शकतो.

 

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!