25 C
Mumbai
Saturday, March 25, 2023
घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रभीमा नदीच्या पात्रात चार मृतदेह आढळल्याने खळबळ

भीमा नदीच्या पात्रात चार मृतदेह आढळल्याने खळबळ

दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात चार मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. १८ ते २२ जानेवारी या कालावधीत पोलिसांना हे चार मृतदेह सापडले असून यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. हे सर्व मृतदेह ३८ ते ४५ या वयोगटातील आहेत. या घटनेने पुणे पोलिसही (Pune Police) चक्रावून गेले असून या आत्महत्या आहेत की हत्या याबाबत तपास सुरु करण्यात आला आहे. (Four dead bodies were found in Bhima river bed atmosphere of fear has spread ) एकापाठोपाठ चार मृतदेह सापडल्यामुळे पोलिसांसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

हे सुद्धा वाचा

Crime News : फक्त 5 हजार रुपयांसाठी दोन गटांत जुंपली; युवकाची लाठ्या मारून हत्या!

Mumbai Crime : गोरेगावातील मनसे पर्यावरण सेनेच्या सचिवावर प्राणघातक हल्ला

VIDEO : धक्कादायक; प्रीस्क्रिप्शन लिहीत असतानाच हृदयरोगतज्ञाला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यू

 

भीमा नदीपात्रात बुधवारी १८ जानेवारी रोजी काही स्थानिक मच्छीमार मासेमारी करीत असताना त्यांना एका महिलेचा मृतदेह आढळला. शुक्रवारी २० जानेवारी रोजी एका पुरुषाचा मृतदेह सापडला. शनिवारी २१ तारखेला पुन्हा एका स्त्रीचा मृतदेह आढळला. तसेच २२ तारखेला पुन्हा पुरुषाचा मृतदेह आढळला. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी संपूर्ण परिसराची तपासणी केली असून परिस्थितीचा आढावा घेतला.

भीमा नदीच्या पात्रात चार मृतदेह आढळल्याने खळबळ
या घटनेमागील नेमके रहस्य काय आहे याबाबत आता तर्क वितर्क लढविण्यात येत असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. २२ जानेवारी रोजी रात्री सापडलेल्या पुरुषाच्या मृतदेहासोबत एक किल्ली सापडली आहे तर महिलेच्या मृतदेहासोबत मोबाईल फोन आणि सोने खरेदीची पावती सापडल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली. या सापडलेल्या दुव्यांवरून पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा ठरविली आहे.

 आणखी मृतदेह सापडण्याची शक्यता

भीमा नदीच्या पात्रात सापडलेलले चार मृतदेह दोन दाम्पत्यांचे असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांच्या मुलांचे मृतदेहही सापडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून नदीपात्रात तपास सुरु आहे. ‘एनडीआरएफ’च्या पथकाचे रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते. या हत्या आहेत की आत्महत्या याचा लवकरच सुगावा लागेल असे पोलिसांनी सांगितले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी