31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रअजितदादांनी दुसरं लग्न का केलं नाही ?

अजितदादांनी दुसरं लग्न का केलं नाही ?

अजितदादांच हे भलंमोठं कार्य लोकांच्या लक्षात येईना. लोकं उगीचच अजितदादांच डोकं तापवतात. एकतर अजितदादांच्या डोक्यावरची केसं गेलीत. केसं गेल्यामुळं टक्कल पडलंय. त्या टकलावर तेल लावल्यामुळं ते तुळतुळीत दिसतं

अजितदादांच हे भलंमोठं कार्य लोकांच्या लक्षात येईना (Why didn’t Ajit Pawar dada marry again). लोकं उगीचच अजितदादांच डोकं तापवतात. एकतर अजितदादांच्या डोक्यावरची केसं गेलीत. केसं गेल्यामुळं टक्कल पडलंय. त्या टकलावर तेल लावल्यामुळं ते तुळतुळीत दिसतं. उन्हातान्हात प्रचार करीत असताना डोकं कितीतरी जाम तापतं. अशा तापलेल्या डोक्यानं प्रचार करायचा, हे अवघड काम आहे. डोक्यावर केस असतील तर उन्हापासून संरक्षण मिळतं. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनाही पूर्वी असंच टक्कलं होतं. आपण हिंदु धर्मात असल्याचा साक्षात्कार उदय सामंत यांना झाला, अन् त्यांनी दुसरं लग्न केल. ते सुद्धा एका अभिनेत्रीशी. पुरूषाने दोन लग्न केली पाहीजेत, हे हिंदू धर्माच्या कुठल्या तरी ग्रंथात लिहलेलं आहे. त्यामुळं त्यांनी दुसरं लग्न केलं. अन् चमत्कार बघा सामंतांच्या डोक्यात केसं उगविली.

अजितदादांनाही हे हिंदू धर्मातील थोर कार्य कुठल्या तरी साधूनं सांगितलं. मग त्यांनी औंधाच्या देवीच्या दर्शनासाठी जायला सुरूवात केली. त्यांनाही दुसरं लग्न करायची इच्छा होती. पण बहुधा औंधाच्या देवीनं कौल दिला नाही. त्यामुळं दादांच्या डोक्यात केसं उगविली नाहीत. औंधांची देवी फार प्रसिद्ध आहे. तुम्हांस माहितच असेल. माहित नसेल तर नक्की औंधाला जाऊन या. दुसरं लग्न न करण्यामागे सुद्धा अजितदादांचा मोठा सामाजिक हेतू होता. मुलींचा जन्मदर कमी होत चालला आहे. पुरूषांचा जन्मदर वाढत चालला आहे. १००० पुरूषांमागे ८०० मुली जन्माला येत आहेत. अशा परिस्थितीत अजितदादांनी दुसरं लग्न केलं, तर महिलांचा मोठा तुटवडा निर्माण होईल. तरूणांना मुलीच मिळणार नाहीत. मग महाराष्ट्रात पावलोपावली द्रौपदीसारखं वस्त्रहरण होईल. त्यामुळंही त्यांनी दुसरं लग्न केलं नाही. सध्या अजितदादांचं डोकं तापलेलं आहे. अशातच दुसऱ्या बाजूला त्यांच्या खांद्यावर बारामती व महाराष्ट्राच्या विकासाची जबाबदारी येवून पडलेली आहे. त्यांना अन्य कुणी साथ देत नसल्याने अजितदादांचे दोन्ही खांदे या जबाबदारीमुळं वाकले आहेत. पण तरीही गेल्या वीस – पंचवीस वर्षात ते विकासाचं काम जोमानं करताहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी