31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeक्राईमदाम दुप्पटचे आमिष : दोन कोटींना गंडा घालणारा अटकेत

दाम दुप्पटचे आमिष : दोन कोटींना गंडा घालणारा अटकेत

शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणुकीवर अनेकांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याच्या घटना ताज्या असतानाच, आता एका फर्ममध्ये आर्थिक गुंतवणुकीवर दामदुप्पट योजनेचे आमिष दाखवून शेकडो नाशिककरांना तब्बल २ कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य संशयिताला शहर आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने बुधवारी (ता. १७) रात्री अटक केली आहे. पंकज प्रभाकर बाविस्कर (प्रोपा, बाविस्कर एन्टरप्रायजेस, रा. विनयनगर, वडाळा-पाथर्डी रोड, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे.

शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणुकीवर अनेकांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याच्या घटना ताज्या असतानाच, आता एका फर्ममध्ये आर्थिक गुंतवणुकीवर दामदुप्पट योजनेचे आमिष दाखवून शेकडो नाशिककरांना तब्बल २ कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य संशयिताला शहर आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने बुधवारी (ता. १७) रात्री अटक केली आहे. पंकज प्रभाकर बाविस्कर (प्रोपा, बाविस्कर एन्टरप्रायजेस, रा. विनयनगर, वडाळा-पाथर्डी रोड, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे.( Double price: Man arrested for duping people of Rs 2 crore)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९- २०२० मध्ये पंकज हा शेअर मार्केटींगमध्ये गुंतवणूक करून त्यावर कमाई करीत होता. मात्र, कोरोना काळात त्याला शेअर मार्केटमध्ये आर्थिक नुकसान झाले. याच दरम्यान, संशयित पंकज याने स्वत:ची फर्म सुरू केली होती आणि त्यात आर्थिक गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिषही दाखविले होते.ज्योती राजेश दायमा (रा. अश्विननगर, नवीन सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, पंकज याने जुलै-२०१६ ते मार्च – २०२१ या कालावधीत बाविस्कर एंटरप्रायजेस कंपनीमध्ये गुंतवणुक केल्यास तीन वर्षात गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट होईल व न झाल्यास १८ टक्के परतावा देण्यात येईल अशी हमी गुंतवणुकदारांना दिली.
त्यानंतर अनेकांकडून रोख ठेवी स्विकारून अश्वासित केलेला मोबदला न देता १५ हून अधिक गुंतवणुकदारांच्या दोन कोटी आठ लाख पन्नास हजार रुपयांचा अपहार करून फसवणुक केली. गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक कुंदन जाधव करीत आहेत.

बाविस्कर एन्टरप्रायजेस या कंपनीत गुंतवणूक केली असल्यास, अशा गुंतवणूकदारांनी पोलीस आयुक्तालयातील शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी केले आहे.संशयित पंकज बावीस्कर हा २०२१ पासून बेपत्ता होता.पंकज याने जुलै-२०१६ ते मार्च – २०२१ या कालावधीत बाविस्कर एंटरप्रायजेस कंपनीमध्ये गुंतवणुक केल्यास तीन वर्षात गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट होईल व न झाल्यास १८ टक्के परतावा देण्यात येईल अशी हमी गुंतवणुकदारांना दिली. त्यासंदर्भात मुंबई नाका पोलिसात बेपत्ताची नोंद करण्यात आलेली होती. याचसंदर्भात बुधवारी (ता.१७) रात्री जबाब देण्यासाठी तो मुंबई नाका पोलिसात आला असता, त्याच पोलिसांनी अटक करीत, त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याची व्याप्ती अधिक असल्याने तो शहर आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी