30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रST संपात फुटीची चिन्हे ; कर्मचारी पुन्हा रुजू होणार असल्याचा महामंडळाचा दावा

ST संपात फुटीची चिन्हे ; कर्मचारी पुन्हा रुजू होणार असल्याचा महामंडळाचा दावा

टीम लय भारी

मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या १४ दिवसांपासून सुरु असलेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपात फू ट पडण्याची शक्यता आहे. महामंडळाने के लेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार असल्याचा दावा एसटी महामंडळाने के ला आहे(ST employees will be re-employed soon)

यासाठी कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन महामंडळाने दिले असून त्यासाठी पोलिसांशी चर्चा के ली जाणार असल्याचे स्पष्ट केले

अनिल देशमुखांची ईडी कोठडी आज संपणार, जामीन मिळणार?

Yezdi Adventure मोटारसायकल लवकरच भारतात लाँच होणार, रॉयल एनफील्डला देणार टक्कर

संपामुळे गुरुवारीही राज्यातील विविध आगार बंदच राहिले. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीचे भाडे आकारून आगारातून खासगी बस, शालेय बस आणि वडाप सोडण्यात आल्या. परंतु काही आगारांबाहेरच खासगी बसगाडय़ा उभ्या करुन अतिरिक्त दरांत प्रवासी घेऊन जाण्याचे प्रकार घडत होते.

 प्रवाशांना होणारा मनस्ताप आणि अव्वाच्यासवा भाडे आकारणी याविरोधात होणाऱ्या कारवाईकडे परिवहन विभागाचे मात्र दुर्लक्षच झाले. दरम्यान, गुरुवारीही संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यात विविध ठिकाणी निदर्शने के ली.

स्वातंत्र्याबाबत कंगनाची मुक्ताफळे ; देशभरात संताप; पद्मपुरस्कार परत घेण्याची मागणी

Private buses restart operations in Pune district after minister assures staff of their safety

काही आगारांच्या प्रवेशद्वारांवरच कर्मचारी ठाण मांडून बसले होते. काही आगारांना पोलिसांच्या छावणीचेही स्वरुप आले होते. आझाद मैदानातही मोठय़ा प्रमाणात जमलेल्या एसटी कर्मचाऱ्यांकडून घोषणाबाजी दिली जात होती

 यात विलीनीकरणाची मागणी घेऊन काही कर्मचारी हाती फलक घेऊन उभे होते. संपाची तीव्रता पाहता एसटी महामंडळाने संप मोडीत काढण्यासाठी निलंबनाच्या कारवाईला सुरुवात के ली आहे.

गुरुवारी २९ विभागातील १ हजार १३५ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. ९ नोव्हेंबरला ३७६ कर्मचाऱ्यांवर, १० नोव्हेंबरला ५४२ जणांवर कारवाई के ल्याने आतापर्यंत एकूण निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ५३ पर्यंत पोहोचली आहे.

ST employees will be re-employed soon
कर्मचाऱ्यांना रुजू झाल्यावर संरक्षण देण्यात येईल. यासाठी पोलिस महासंचालकांशीही चर्चा करण्यात आल्याचे ते म्हणाले.

या घडामोडीनंतर राज्यातील संपकरी एसटीचे काही कामगार पुन्हा कर्तव्यावर परतण्यास तयार असल्याचा दावा महामंडळाने के ला आहे.

झाले काय?

* परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी बुधवारी राज्यातील एसटीचे विभाग नियंत्रक, आगार प्रमुख आणि एसटीचे अन्य वरिष्ठ अधिकारी यांच्याशी के लेल्या चर्चेनंतर काही कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होण्यास तयार असल्याची माहिती दिली.

* अशा कर्मचाऱ्यांना रुजू झाल्यावर संरक्षण देण्यात येईल. यासाठी पोलिस महासंचालकांशीही चर्चा करण्यात आल्याचे ते म्हणाले.

* एसटी कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे व सेवा पूर्ववत व्हावी यासाठी विशेष अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

नवे निलंबन..

गुरुवारी १,१३५ कर्मचाऱ्यांना निलंबित के ले असून आतापर्यंत निलंबनाची कारवाई के लेल्या कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ५३ पर्यंत पोहोचली आहे. गुरुवारी  पुणे विभागातील सर्वाधिक १३८ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. तर जळगाव विभागातील ९१, ठाणे विभागातील ७३, बीड विभागातील ६७, मुंबई विभागातील ६४ व अन्य विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी