31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक महानंदाबाबत राज्य सरकार एन.डी.डी.बी.कराराचा मसुदा सार्वत्रिक करा : किसान सभा

नाशिक महानंदाबाबत राज्य सरकार एन.डी.डी.बी.कराराचा मसुदा सार्वत्रिक करा : किसान सभा

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, अखिल भारतीय किसान सभा व राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवून सुद्धा राज्य सरकारने महानंदा एन.डी.डी.बी.ला चालवायला देण्याच्या बद्दलच्या हालचाली तीव्र केलेले आहेत. महानंदाच्या सर्व संचालकांनी राजीनामा दिला असून महानंदाबाबत एन.डी.डी.बी. बरोबर करार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे राज्य सरकारचे मंत्रीच जाहीररित्या सांगत आहेत. एन.डी.डी.बी.ने 253 कोटी 57 लाख रुपये राज्य सरकारकडे यासाठी मागितले असल्याचेही मंत्री सांगत आहेत. महानंदाची कोट्यावधीची मालमत्ता, जमीन, यंत्रसामुग्री एन.डी.डी.बी.कडे आयती हस्तांतरित करायची व वरून 253 कोटी 57 लाख रुपये द्यायचे आणि कामगारांचे पगार, इतरही देणी कर्ज इत्यादीअनेक बाबींची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारायची

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, अखिल भारतीय किसान सभा व राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवून सुद्धा राज्य सरकारने महानंदा एन.डी.डी.बी.ला चालवायला देण्याच्या बद्दलच्या हालचाली तीव्र केलेले आहेत. महानंदाच्या सर्व संचालकांनी राजीनामा दिला असून महानंदाबाबत एन.डी.डी.बी. बरोबर करार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे राज्य सरकारचे मंत्रीच जाहीररित्या सांगत आहेत. एन.डी.डी.बी.ने 253 कोटी 57 लाख रुपये राज्य सरकारकडे यासाठी मागितले असल्याचेही मंत्री सांगत आहेत.
महानंदाची कोट्यावधीची मालमत्ता, जमीन, यंत्रसामुग्री एन.डी.डी.बी.कडे आयती हस्तांतरित करायची व वरून 253 कोटी 57 लाख रुपये द्यायचे आणि कामगारांचे पगार, इतरही देणी कर्ज इत्यादीअनेक बाबींची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारायची हेच जर कराराचे स्वरूप असेल तर राज्य सरकार हा घाट्याचा सौदा का करत आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महानंदाही कोणाचीही खाजगी मालमत्ता नाही. राज्यभरातील लाखो दूध उत्पादकांच्या घामातून उभी राहिलेली ही मालमत्ता दूध उत्पादकांना व राज्याच्या जनतेला विश्वासात न घेता एन.डी.डी.बी.च्या घशात घालता येणार नाही, ही बाब राज्य सरकारने समजून घेतली पाहिजे. या संपूर्ण व्यवहारामध्ये पुरेशी पारदर्शकता न आणता घाई गडबडीत अशाप्रकारे महानंदा एन.डी.डी.बी.च्या घशात घालणे संशयास्पद आहे.

राज्य सरकारने याबाबत पारदर्शकता ठेवावी व कराराचा मसुदा सार्वत्रिक करावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत.

डॉ. अजित नवले
दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, महाराष्ट्र

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी