28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकच्या आदिवासी पट्ट्यातील विद्यार्थ्यांनि गिरवले बुद्धिबळाचे धडे

नाशिकच्या आदिवासी पट्ट्यातील विद्यार्थ्यांनि गिरवले बुद्धिबळाचे धडे

मैदानी खेळात नेहमीच प्राविण्य दाखवणाऱ्या, नाशिकच्या आदिवासी पट्ट्यातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण क्रीडा विकास व्हावा, या उद्देश्याने नाशिक जिल्हा बुद्धीबळ संघटना आणि  बोटवनिक चेस स्कुलमार्फत,नाशिक जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी बुद्धीबळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांतर्गत पेठ तालूक्यातील कुळंवडी आणि नाचलोंढी येथील जिल्हा  परिषदेच्या  प्राथमिक  शाळेत बुद्धिबळ प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले.३५० विद्यार्थी यासाठी उपस्थित होते. या प्रशिक्षण वर्गात अनुभवी बुद्धीबळ प्रशिक्षक सुनील शर्मा, यांनी अतिशय ओघवत्या शब्दशैलीमध्ये विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे धडे दिले. तसेच त्याची मांडणी समजून दिली.

हे देखील वाचा ..
बुद्धिबळाच्या  डावाचे लेखन आणि त्यातील महत्त्वाच्या काही चाली याचेही उत्तमरीत्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुळवंडी येथे जिल्हा परिषद कुळवंडी शाळा ,जिल्हा परिषद कडवई पाडा शाळा ,जिल्हा परिषद खराडी पाडा शाळा, जिल्हा परिषद पळशी बुद्रुक शाळेतील तर नाचलोंढी येथील जिल्हा  परिषदेच्या शाळेत झालेल्या प्रशिक्षण वर्गात नाचलोंढी, कोळुष्टी ,चिकाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.अन्य खेळाचे प्रशिक्षण आदिवासी  भागाकडे दुर्लक्ष करत असताना सुनिल शर्मा यांनी आयोजित केलेला हा प्रशिक्षण वर्ग या भागातील विद्यार्थ्यांना पूढे नेण्यास नक्कीच मदत करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
अन्य खेळाचे प्रशिक्षण आदिवासी  भागाकडे दुर्लक्ष करत असताना सुनिल शर्मा यांनी आयोजित केलेला हा प्रशिक्षण वर्ग या भागातील विद्यार्थ्यांना पूढे नेण्यास नक्कीच मदत करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रशिक्षण वर्गात उत्तम सहभाग घेणाऱ्या,  उषा चौधरी या विद्यार्थिनीला आणि श्रेयस चौधरी या विद्यार्थ्याला  यावेळी प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. यावेळी गुणवान विद्यार्थ्यांना नाशिकहुन ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा मनोदय सुनिल शर्मा यांनी व्यक्त केला. उपस्थित  विद्यार्थ्यांना  सुनील शर्मा यांच्यामार्फत प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.यावेळी कुळंवडी केंद्रप्रमुख गोरख गायकवाड नाचलोंढी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शांताराम शेंडे,
कुळंवडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक युवराज नंदन,पंडीत महाले,दौलत धूम ,श्रीमती
करुणा वाडेकर दिपक गरुड, उमाकांत  गोटे,वैभव शिंदे, अशोक कनोजे, कांता ठेपणे, कोळुष्टी येथील जिल्हा परिषद शाळेचे अरूण गायकवाड,बाबाराव कदम आदी उपस्थित होते .शिबिर यशस्वीतेसाठी श्रीमती करुणा वाडेकर, बुद्धीबळ प्रशिक्षक सुनील शर्मा, अजिंक्य तरटे  आदिंनी परिश्रम घेतले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी