31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात सध्या पेन ड्राईव्हचे फॅड आले आहे : सुप्रिया सुळे

महाराष्ट्रात सध्या पेन ड्राईव्हचे फॅड आले आहे : सुप्रिया सुळे

टीम लय भारी 

मुंबई:

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलं सरकार महागाई सारख्या गंभीर प्रश्नापेक्षा पेन ड्राईव्हचे नवीन फॅड सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणारे असल्याची टीका राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule ) यांनी भाजपवर (BJP) केली आहे.

त्यांनी बारामतीत माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी भाजपच्या कारभारावर टीका केली. भाजप सरकार सूडाचे राजकारण करत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात सुरू असलेल्या ईडी, सीबीआय धाडसत्रांवर केंद्रीय तपास यंत्रणा येत्या काळात कोणावर धाडी टाकणार, हे विरोधी पक्षांच्या नेत्यांना आधीच कसं कळतं? असा सवाल करत त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणाच्या स्वायतत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले, असे सुप्रिया सुळे म्हाणाल्या.

एकच पक्ष आयुष्यभर सत्तेत नसतो. नियम कायदे बनविले जातात. मात्र विरोधकांना त्रास व्हावा यासाठी सत्तेचा गैरवापर होऊ नये. असा प्रयत्न सर्वांनी करावा सूडाचे राजकारण या देशात या पूर्वी कधीच नव्हते. मात्र, सातत्याने सध्या ते दिसत आहे. जनतेला महागाई तसेच इंधन दरवाढीपासून दिलासा कसा देता येईल, हे पाहणे जास्त महत्वाचे आहे, अश्या शब्दात सुळेंनी टीका भाजपवर निशाणा साधला.

हे ही पाहा:

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी