28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रसुप्रियाताई सुळे संकटग्रस्त शाळांच्या मदतीसाठी गेल्या धावून

सुप्रियाताई सुळे संकटग्रस्त शाळांच्या मदतीसाठी गेल्या धावून

टीम लय भारी

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणाला मोठा फटका बसला आहे. यात शाळांचेही मोठे नुकसान झाले आहे. या शाळांना मदत करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आज धावून आल्या ( Supriya Sule helped to schools ).

वादळामुळे कोकणातील अनेक शाळांचे पत्रे उडून गेले आहेत. अशा तब्बल ७५ शाळांना सुप्रियाताईंनी पत्रे व ढापांचे वाटप केले. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून ही मदत करण्यात आली.

Moneyspring

नांदगाव ( मुरूड ) येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाला सुप्रियाताईंनी आज भेट दिली  ( Supriya Sule visits to Murud ). या भेटीनंतर नांदगावसह इतर गावांतील शाळांना पत्रे, ढापे व इतर साहित्य देण्यात आले.

हे सुद्धा वाचा

Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा निरोप आला, अन् IAS शेखर चन्ने यांनी अडचणीत असलेल्या 9 जणांना घरी पोचविले

Supriya Sule : सुप्रिया सुळेंची माणूसकी, लॉकडाऊनमुळे ताटातूट झालेल्या माय लेकराची घालून दिली भेट

Covid19 : सुप्रिया सुळेंना लोक विचारताहेत, राजेश टोपे डॉक्टर आहेत का ?

खासदार सुप्रिया सुळेंची राजेश टोपेंना शाबासकी; म्हणाल्या ‘सुपरमॅन’

यावेळी खासदार सुनील तटकरे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने आपदग्रस्त शाळांना पत्रे व इतर पूरक साहित्य वाटप करण्यासाठी आज खासदार सुप्रियाताई सुळे ट्रस्टच्या कार्याध्यक्ष या नात्याने मुरुड – नांदगाव येथे आल्या होत्या.

Mahavikas Aghadi

शिक्षण हा सुप्रियाताईंचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे सामाजिक काम केले होते ( Supriya Sule has worked for education in past ). ग्रामीण व आदिवासी भागांतील शैक्षणिक विकासासाठी त्यांनी रचनात्मक काम केले होते.

निसर्ग चक्रीवादळात ( Nisarg storm affected to Schools in Konkan ) शाळांचे नुकसान झाले आहे. ऐन शैक्षणिक वर्षाच्या तोंडावरच हे संकट कोसळले. अशातच आता ग्रामीण भागातील शाळा कधीही सुरू होऊ शकतील अशी स्थिती आहे. परंतु शाळांची दुरूस्ती झाली नाही, तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल ही बाब ध्यानी घेऊन खासदार सुप्रियाताईंनी या शाळांसाठी तातडीने मदत देण्याची भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

सुप्रियाताई सुळे संकटग्रस्त शाळांच्या मदतीसाठी गेल्या धावून

चक्रीवादळानंतर पंधरवड्यापूर्वी शरद पवार यांनी कोकणाला भेट दिली होती ( Sharad Pawar had visit to Konkan ). त्यावेळी शेतकऱ्यांसह शाळांचेही मोठे नुकसान झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या पार्श्वभूमीवर सुप्रियाताईंची आज धावता दौरा करून शाळांना मदत पोचती केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी