32 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रIPS अधिकाऱ्याने केले एका ग्राम चळवळीचे कौतुक !

IPS अधिकाऱ्याने केले एका ग्राम चळवळीचे कौतुक !

शहराप्रमाणे आता ग्रामीण भाग हा सुजलम सुफलम म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. गांधीजी म्हणाले होते की खेड्याकडे चला. अशातच आता या खेडेभागात विविध प्रभोधन चळवळ होताना दिसत आहेत. तर याचे अनेकजण कौतुक देखील करताना दिसत आहेत. अशातच खेडेगावामध्ये सध्या अनेक प्रबोधन चळवळ घडवल्या जात आहेत. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील दुधेबावी या गावामध्ये अनेकदा प्रबोधन चळवळ घडवली गेली आहे. याचं कौतुक केवळ फलटण तालुका आणि सातारा जिल्हा न करता राज्यामध्ये होत असून आयपीएस आधिकाऱ्यांनी देखील केलं आहे. समीर शेख असं त्याचं नाव असून त्यांनी गावाला शबासकीची थाप दिली आहे.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी प्रास्ताविकात सातत्यपूर्ण २३ वर्ष राबवित असणारी संत गाडगेबाबा व्याख्यानमाला, मोफत आरोग्य शिबीरे, वाचनालय याबाबतीत माहिती विशद केली.

‘या’ मान्यवरांनी लावली हजेरी

यावेळी जिल्हा शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र बोराटे,व्हाईस चेअरमन विजय बनसोडे, संचालक तानाजी कुंभार, विक्रम डोंगरे,पत्रकार ज्ञानेश्वर भोईटे,फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघांचे अध्यक्ष सुभाष सोनवलकर,प्रा. लक्ष्मण एकळ, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजयकुमार नाळे, कार्याध्यक्ष संतोष भांड,प्रा. महेंद्र एकळ, सचिव विठ्ठल सोनवलकर, खजिनदार डॉ. युवराज एकळ,सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर, सचिन काळे,राहुल नाळे, वनपाल चंद्रकांत गेजगे,संचालक भानुदास सोनवलकर,राजेंद्र नाळे, ज्ञानेश्वर सोनवलकर,संतोष मोरे,शेखर चांगण ,सुमित नाळे, यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

सूत्रसंचालन संत गाडगेबाबा व्याख्यानमाला कमिटीचे अध्यक्ष डॉ. सागर कराडे यांनी केले. तर स्वागताचा मान हा सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर यांना देण्यात आला. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजयकुमार नाळे यांनी आभार मानले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी